गुजरातमध्ये ‘पबजी’ खेळणाऱ्या १० जणांना अटक

गुजरातमध्ये ‘पबजी’ खेळणाऱ्या १० जणांना अटक

भारतात ‘प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड’ (पबजी) गेम तरूणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. मनोरंजन आणि मनाच्या समाधानासाठी खेळले जाणारे मोबाईल गेम्स आता जिवघेणे ठरत असून त्यांचा अतिरेक आता जीवावर बेताना दिसत आहे. तसेच या खेळाचे अनेक दुष्परिणाम आतापर्यंत समोर आले असून अनेक तरूणांमध्ये या खेळामुळे हिंसक भावना वाढीस लागत आहे. त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीने राजकोटमध्ये पबजी गेमवर ६ मार्च रोजी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असताना देखील या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे.

पबजीवर बंदी

पबजी हा गेम खेळण पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. या गेमने तरुणांसह शाळेतील विद्यार्थ्यांनाही अ राजकोट पोलिसांनी पबजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पबजी खेळाक्षरश: वेड लावले असून तरुणांमध्ये हिंसक वृत्ती वाढत आहे. याशिवाय या गेममुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील परिणाम होत आहे. सामाजिक सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पबजी गेमवर बंदी घालण्यात येत आहे’, असे पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ आणि कलम ३७ (३) अंतर्गत कारवाई केली जाई असा इशाराही पोलिसांनी दिला होता. तसेच राजकोट पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली असून आत्तापर्यंत १० जणांना अटक केली आहे. या गुन्ह्याचे स्वरुप पाहता संबंधित तरुणांची तातडीने जामिनावर सुटका होते. यानंतर कोर्टात हे प्रकरण जाते आणि तिथे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुनावणी होते, असे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पोलीस मुख्यालयाजवळच पबजी खेळणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राजकोटमधील कलावड येथे महाविद्यालयाच्या बाहेरील चहाच्या टपरीवर पबजी गेम खेळणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. तिघांचीही जामिनावर सुटका देखील झाली आहे. तीन पैकी एक जण हा शहरातील खासगी कंपनीत काम करतो. तर दुसरा तरुण हा कामगार आहे. तर तिसऱ्या तरुणाचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रोहित रावल यांनी दिली आहे.


वाचा – सुरतमध्ये ‘पबजी’वर बंदी, खेळताना आढळ्यास होणार कारवाई

वाचा – ‘पबजी’साठी मुलाने चोरले ५० हजार


 

First Published on: March 14, 2019 8:50 AM
Exit mobile version