Pulwama terror attack – ‘पाकिस्तान सुपर लीग’चं प्रक्षेपण भारतात बंद!

Pulwama terror attack – ‘पाकिस्तान सुपर लीग’चं प्रक्षेपण भारतात बंद!

'पाकिस्तान सुपर लीग'चं प्रक्षेपण भारतात होणार नाही. 'डीस्पोर्ट' या स्पोर्ट चॅनलने हा निर्णय घेतला आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताची ख्यातनाम म्युजिक कंपनी टी सिरिजने पाकिस्तानच्या गायकांचे सर्व व्हिडिओ यूट्यूबवरुन हटवले आहेत. त्यामागोमाग आता ‘डीस्पोर्ट’ या स्पोर्ट चॅनलने पाकीस्तान सुपर लीग (पीएसएल) सामन्यांचे भारतात प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेटला मोठा झटका बसला आहे. भारतात ज्याप्रमाणे ‘इंडीयन प्रिमियर लीग’चे (आयपीएल) सामने खेळले जातात, अगदी त्याचधर्तीवर पाकिस्तानमध्ये ‘पाकिस्तान सुपर लीग’चे (पीएसएल) सामने खेळले जातात. पीएसएलचे दोन सीझन याअगोदर वेबवर प्रसारीत करण्यात आले होते. त्यानंतर गेल्यावर्षीच ‘डीस्पोर्ट’ने याचे प्रक्षेपण करण्याचा हक्क मिळवला होता. परंतु, आता डीस्पोर्टने सुपर लीगचे प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘राष्ट्रीय मुद्द्यांवर आम्ही संवेदनशील आहोत’

डीस्पोर्ट चॅनलच्या एका अधिकाऱ्याने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ‘आम्ही पाकिस्तान सुपर लीगचे भारतात प्रसारण थांबवले आहे. राष्ट्रीय मुद्द्यांवर आम्हीही संवेदनशील आहोत, त्यामुळे पुलवामा येथे घडलेल्या हल्ल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे.’ त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी एका वाहिनीनेदेखील पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार घातला होता.

First Published on: February 17, 2019 5:02 PM
Exit mobile version