Coronavirus: कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटला ओळखण्यासाठी महाराष्ट्रातून नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले

Coronavirus: कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटला ओळखण्यासाठी महाराष्ट्रातून नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले

'जिनोम सिक्वेंसिंग' चाचण्या सुरू,पहिल्या टप्प्यात १९६ सॅम्पलची चाचणी

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. सध्या सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ३५४ आहेत. पण तरीही कोरोना व्हायरसचे कोणतेही नवे रुप समोर आले का? हे ओळखण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील काही नमुने गोळा करून ते जिनोम सिक्वेंसिंग करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. या मागचा एक उद्देश आहे की, कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटला ओळखणे. याबाबतची माहिती एका अधिकाऱ्याने पुण्यात दिली आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सर्वात वेगाने फैलाव होणारा कोरोना डेल्टा व्हेरियंटने स्वतःमध्ये काही बदल करून ‘डेल्टा प्लस’ रुपात बदलले आहे आणि असे मानले जात आहे की, कोरोनाच्या उपचारासाठी नुकतीच मंजूर करण्यात आलेले मोनोक्लोनॉल अँटीबॉडी कॉकटेल थेरेपी खूप प्रभावी नाही आहे.’

महाराष्ट्र एपिडेमिओलॉजी सेलचे प्रमुख डॉ. प्रदीप अवाटे म्हणाले की, ‘आम्ही विविध जिल्ह्यांतून नमुने एकत्र करून चाचणी करण्यासाठी पाठवले आहेत. कारण डेल्टा प्लस रुप आहे की नाही, हे ओळखू शकतो. याचा अहवाल लवकरच समोर येईल.’

दरम्यान गेल्या शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या रुपासंबंधित आलेल्या अहवालात आरोग्य एजन्सीने सांगितले की, ‘डेल्टा प्लस व्हेरियंट ७ जूनपर्यंत भारतात सहा जिनोममध्ये आढळला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील डेल्टा प्लस असल्याची शक्यता असल्यामुळे काही नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहे.’

राज्यात सोमवारी ८ हजार १२९ नवे कोरोनाबाधित आढळले असून २०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १४ हजार ७३२ जण बरे होऊन घरी गेले. आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९ लाख १७ हजार १२१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख १२ हजार ६९६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५६ लाख ५४ हजार ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिनोम सिक्वेंन्सिंग म्हणजे काय? 

जिनोम सिक्वेंन्सिंगमध्ये व्हायरसची जनुकीय संरचना कशी असते याचा शोध घेतला जातो. व्हायरसमध्ये DNA आणि RNA कोड असतात. त्यानुसार व्हायरसची संरचना ओळखली जाते. जेव्हा व्हायरसच्या संरचनेत बदल होते, त्यालाच व्हायरसचा नवा स्ट्रेन म्हटले जाते.

हेही वाचा – Coronavirus India Update: पॉझिटिव्ह बातमी! देशातील रिकव्हरी रेट ९५.६४ टक्क्यांवर; ७५ दिवसांनंतर नव्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट


 

First Published on: June 15, 2021 11:43 AM
Exit mobile version