नितीन गडकरी म्हणतात ‘..म्हणून ३६ राफेल खरेदी केले’!

नितीन गडकरी म्हणतात ‘..म्हणून ३६ राफेल खरेदी केले’!

नितीन गडकरी

गेल्या काही महिन्यांपासून राफेल करारांवरून काँग्रेसनं उठवलेलं वादळ अद्याप शमण्याचं नाव घेत नाहीये. यासंदर्भात नुकताच केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवा खुलासा केला आहे. ‘पैशांमुळेच आम्ही फक्त ३६ विमानांच्या खरेदीचा व्यवहार केला’, असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. प्रसिद्ध करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीन गडकरींनी ही माहिती दिली आहे. तसेच, ‘नवं तंत्रज्ञान आल्यास नवी विमान खरेदी करता येईल’, असं देखील गडकरी यावेळी म्हणाले.

…मग १२६ विमानं का खरेदी केली नाहीत?

सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल अनेक प्रश्न यावेळी करण थापर यांनी नितीन गडकरींना विचारले. यावेळी राफेलचा मुद्दा आल्यानंतर गडकरींनी विद्यमान सरकारने राफेलचा स्वस्तात सौदा केल्याचा उल्लेख केला. तेव्हा ‘जर आधीच्या सरकारपेक्षा या सरकारला स्वस्तात राफेल विमानं मिळाली, तर त्यांनी सगळी १२६ विमानं का खरेदी केली नाहीत’? असा प्रश्न करण थापर यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना गडकरींनी वरील दावा केला.

काय म्हणाले नितीन गडकरी?

तुम्ही १०० विमानं खरेदी करण्याचा सल्ला कसा देऊ शकता? किमान आपल्याकडे एवढी विमानं खरेदी करण्याइतपत पैसे असायला हवेत. त्यामुळे सरकारच्या आर्थिक परिस्थितीवर विमान खरेदीचा निर्णय अवलंबून होता. त्याशिवाय जेव्हा तुम्ही इतका मोठा आणि महाग व्यवहार करता, तेव्हा एकदमच न करता तुम्ही टप्प्याटप्प्याने खरेदी करता. समजा. जर ३६ विमानांनंतर तुम्हाला नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झालं, तर मग आपण जुन्या तंत्रज्ञानाची राफेल विमानं का खरेदी करणार?

नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री


हेही वाचा : राफेलनंतर आणखी एक गिफ्ट; अनिल अंबानींना १,१२० कोटींची करमाफी

राहुल गांधींचा ३० हजार कोटींचा आरोप!

राफेल प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत ‘चौकीदार चोर है’ या कॅम्पेनचा धुरळा उडवून दिला होता. राफेल खरेदी करारादरम्यान मोदींना अनिल अंबानींना तब्बल ३० हजार कोटींचा फायदा मिळवून दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच, खरेदी व्यवहार करताना हवाई दलातल्या अधिकाऱ्यांसोबतच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील फ्रान्ससोबत समांतर बोलणी करत असल्याचे कागदोपत्री पुरावेच राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये मांडून या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू केली होती.


हेही वाचा – राफेलचे सत्य काय?
First Published on: May 14, 2019 8:23 PM
Exit mobile version