राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार; भाजपची टीका

राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार; भाजपची टीका

राजस्थानमधील काँग्रेसच्या सरकारवर अस्थिरतेचे संकट घोंगावू लागलं आहे. राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार आहेत असा आरोप भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी केला आहे. मध्य प्रदेशातमधील परिस्थितीलाही तेच जबाबदार होते. काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना राहुल गांधी मोठं होऊ देत नाहीत, असा आरोप उमा भारती यांनी केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत होती. त्यानंतर आता सचिन पायलट यांची परिस्थितीही काही फारशी वेगळी नाही असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे.

सचिन पायलट यांनी मंत्रीपदांवरुन नाराज आहेत. सचिन पायलट हे राजस्थानचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, आपल्याला हवे असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत, हवे असलेले अधिकारी-कर्मचारी मिळत नाहीत अशी तक्रार सचिन पायलट यांनी केली आहे. सचिन पायलट यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं देखील आहे. मात्र, त्यांना कोणत्याही समारंभात किंवा उद्घाटनासाठी बोलावलं जात नाही, अशा अनेक मुद्द्यांवर सचिन पायलट नाराज आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्यासोबत १०७ आमदार आहेत हा जो दावा केलाय तो चुकीचा असून माझ्यासोबत २५ आमदार आहेत असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये अस्थिर स्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार आहेत असं आता भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी म्हटलं आहे.

 

First Published on: July 13, 2020 3:22 PM
Exit mobile version