Rajasthan Cabinet Reshuffle: राजस्थानच्या नव्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, ११ मंत्री आणि ४ राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

Rajasthan Cabinet Reshuffle: राजस्थानच्या नव्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, ११ मंत्री आणि ४ राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

Rajasthan Cabinet Reshuffle: राजस्थानच्या नव्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, ११ मंत्री आणि ४ राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

राजस्थानमध्ये आज, रविवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि १५ नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पाडला. काल, शनिवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मंत्रिमंडळाची पुनर्रचनेसाठी सर्व मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला होता. त्यानंतर आज नव्या मंत्र्यांकडून शपथ घेतली. यामध्ये सचिन पायलट यांचे पाच जवळचे मंत्री नव्या मंत्रिमंडळात सामिल झाले आहेत. आज ११ मंत्री आणि ४ राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. सचिन पायलट यांच्या गटातील हेमाराम चौधरी यांनी सर्वप्रथम मंत्री पदाची शपथ घेतली.

राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल कलराज मिश्र यांनी या आमदारांकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपालांनी हेमाराम चौधरी, महेंद्रजीत मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा, ममता भूपेश, भजनलाल जाटव, टीकाराम जूली, गोविंद राम मेघवाल आणि शकुंतला रावत यांच्याकडून मंत्रीपदाची शपथ घेतली. तर जाहिदा खान, बृजेंद्र सिंह ओला, राजेंद्र गुढा आणि मुरारीलाल मीणा यांच्याकडून राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. जाहिदा खान यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली.

दरम्यान पुढील महिन्यात गहलोत सरकार ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत असून हा मंत्रिमंडळातील पहिलाच फेरबदल आहे. या फेरबदलाकडे पक्षातील गटबाजी दूर करण्याबरोबरच प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्यासाठीची कसरत म्हणून याकडे पाहिले जात आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात बंड करताना पायलट यांच्यासह हटवण्यात आलेल्या विश्वेंद्र सिंह आणि रमेश वीणा यांना पुन्हा मंत्री करण्यात आले आहे. तर बीएसपीमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सहा आमदारांपैकी राजेंद्र गुढा यांनी मंत्रीपद देण्यात आले आहे.

या नव्या मंत्रिमंडळ विस्तारातून मंत्री रघु शर्मा, हरीश चौधरी आणि राज्यमंत्री गोविंद सिंह डोटासरा यांच्या हटवण्यात आले आहे. या तिन्ही मंत्र्यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करत राजीनामा पत्र यापूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवले होते. राजस्थान काँग्रेसचे डोटासरा अध्यक्ष आहेत. तर डॉ. रघु शर्मा यांना काँग्रेसने गुजरात आणि हरीश चौधरी यांना पंजाब प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.


हेही वाचा – Farm Laws Withdrawn: MSPला कायदेशीर हमी मिळेपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहणार


First Published on: November 21, 2021 5:39 PM
Exit mobile version