राजस्थानमध्ये गहलोत मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या शपथविधीची शक्यता?

राजस्थानमध्ये गहलोत मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या शपथविधीची शक्यता?

राजस्थानध्ये राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. राज्यस्थानध्ये पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद मिटला असून आता राज्यस्थानमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे कोणाकोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आता कॅबिनेटमधील तीन ते चार मंत्र्यांच्या जागी नवे चेहरे पाहायला मिळणार असून उद्या संध्याकाळी चार वाजता शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सर्वच मंत्र्यांनी अचानकपणे राजीनामा दिल्यामुळे सर्वच अवाक झाले आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक आज(शनिवार) पार पडली. या बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला. काँग्रेसच्या कार्यालयात उद्या(रविवार) दुपारी २ वाजताच्या सुमारास महत्त्वाची बैठक पार पडणार असून पुढील सर्व निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे.


हेही वाचा: यूएईनंतर IPL 2022चा थरार कुठे रंगणार?, बीसीसीआय सचिव जय शाह यांची मोठी घोषणा


 

हे फेरबदल हायकमांड करून करण्यात आले असून फॉर्म्यूल्यावर शिकामोर्तब करण्यात आला आहे. आगामी वर्षातील २०२३ मधील निवडणुका लक्षात घेता, हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

मंत्रिपदासाठी कोणते आहेत नवीन चेहरे?

सचिन पायलट यांच्या नवीन मंत्रिमंडळात दिपेंद्र शेखावत, हेमाराम चौधरी, बृजेन्द्र ओला, रमेश मीणा, मुरारीलाल मीणा यांची नावे आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे गहलोत यांच्या मंत्रिमंडळात बसपाचे राजेंद्र गुढा, संयम लोढा, रामलाल जाटस जाहिदा खान यांची नावे समोर आली आहेत.

First Published on: November 20, 2021 9:12 PM
Exit mobile version