रजनीकांत आणि त्यांचा पक्ष लोकसभा लढवणार नाही

रजनीकांत आणि त्यांचा पक्ष लोकसभा लढवणार नाही

सुपरस्टार रजनीकांत

आगामी लोकसभा निवडणुका आपण अथवा आपला पक्ष लढणार नाही. तसेच निवडणुकीत आपल्या पक्षाचे चिन्ह आणि झेंड्याचा कोणीही वापर करू नये, असे दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

रजनीकांत यांनी गेल्यावर्षी राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच ते भाजपात जाणार असल्याचीही संघासह अनेक भाजपा नेत्यांकडून वक्तव्ये होत होती. मात्र, त्यांनी स्वत:चा पक्ष काढण्याचे ठरविले होते. यामुळे रजनीकांत लोकसभा निवडणूक लढविणार अशी चर्चाही जोर धरत होती. मात्र, रजनीकांत यांनी आज त्यावर पडदा टाकला आहे.

आपला पक्ष किंवा आपण येती लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणीही वापरू नये असेही त्यांनी बजावले आहे. रजनीकांत यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते नाराज झाले आहेत.

रजनीकांत यांनी म्हटले की, आपला पक्ष कोणत्याही इतर पक्षाला पाठिंबा किंवा मदत करणार नाही. यामुळे कोणीही आपल्या पक्षाचा झेंडा, फोटो किंवा अन्य तपशील वापरू नये. तसेच रजनी मक्कल मंद्रम किंवा रजनी फॅन क्लब अशी नावेही वापरू नयेत. तसेच तामिळनाडूला पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे जो पक्ष त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याला लोकांचा पाठिंबा मिळेल, असेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: February 18, 2019 4:29 AM
Exit mobile version