Akasa Air: राकेश झुनझुनवाला यांच्या ‘अकासा एअर’ला हिरवा झेंडा, २०२२ची बुकींग फुल्ल

Akasa Air: राकेश झुनझुनवाला यांच्या ‘अकासा एअर’ला हिरवा झेंडा, २०२२ची बुकींग फुल्ल

Akasa Air: राकेश झुनझुनवाला यांच्या 'अकासा एअर'ला हिरवा झेंडा, २०२२मध्ये उड्डाणाची शक्यता

भारतातील अरबपती इनवेस्टर राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala)  यांच्या अकासा एअरला (Akasa Air)  केंद्र सराकारकडून हिरवा झेंडा मिळाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अकासा एअरलाइनला हरकत प्रमाणपत्र दिले आहे. कंपनीने सोमवारी यासंदर्भातील निवेदन प्रसिद्ध केले आहे. अकासा एअर लाईन्स २०२२ पर्यंत सुरू करण्यात येणार आहे.  राकेश झुनझुनवाला यांनी काही दिवासांपूर्वीच पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर झुनझुनवाला यांच्या कंपनीचा प्रस्ताव मंजूर झाला असावा अश्या चर्चा रंगल्या होत्या मात्र सोमवारी यासंदर्भात निर्णय देत केंद्र सरकारने झुनझुनवाला यांच्या अकासा एअरलाईन्सला परवानगी दिली आहे.

ब्लूमबर्द टिव्हीला झुनझुनवाला यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी असे म्हटले आहे की, नवीन विमान कंपन्यांसाठी ३.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार असून यातील ४० टक्के शेअर्स ते आपल्याकडे ठेवणार आहेत. पुढील १५-२० दिवसात सेंट्रल एव्हिएशन मिनिस्ट्रीकडून कंपनीला एनओसी मिळेल असे ते म्हणाले.

भारताचे प्रतिस्पर्धी असलेल्या एविएशन मार्केटमध्ये अकासा एअरने अल्ट्रा लो कॉस्ट कॅरिअर मॉडल आणण्याची योजना केली आहे. ज्यात त्यांनी ३.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. येत्या चार वर्षात झुनझुनवाला यांनी एकूण ७० विमाने खरेदी करण्याची योजना आखली आहे. कंपनीसाठी काही अनुभवी लोकांची टीम तयार करण्यात आलू असून इंडिगोचे माजी सीईओ आदित्य घोष आणि जेट एअवरेजचे माजी सीईओ विनय दुबे यांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय लोकांना स्वस्तात विमान करता यावा यासाठी झुनझुनवाला ही विमान सेवा सुरू करणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. आकाश एअर असे झुनझुनवाला यांच्या विमान कंपनीचे नाव असणार आहे. आकाश एअरलाईन्स मधून एकाच वेळी १८० लोकांच्या प्रवासाची सोय करण्यात आली आहे. काही विमानांची कंपनीकडून टेस्ट देखील सुरू आहे.


हेही वाचा – Adani Airport: अदानीला अच्छे दिन! मुंबईनंतर जयपूर विमानतळावर राज

First Published on: October 12, 2021 1:37 PM
Exit mobile version