राम रहीम सिंगचा ‘असाही’ विश्वविक्रम

राम रहीम सिंगचा ‘असाही’ विश्वविक्रम

एमएसजी सिनेमाचे पोस्टर

सबकुछ राम रहिम असलेल्या चित्रपटाची दखल

साध्वी बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगच्या नावावर विश्वविक्र नोंदवण्यात आला आहे. मेसेंजर ऑफ गॉड या सिनेमात त्याने ३० विविध भुमिका निभावल्या होत्या. कोणत्याही सिनेमात एखाद्या कलाकाराने सर्वाधिक भुमिका निभावण्याचा हा विक्रम असल्याचा एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचा दावा आहे. त्यामुळे एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेले प्रमाणपत्र राम रहीम सिंगच्या अनुयायांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. प्रमाणपत्राचे फोटो टि्वटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

५ डिसेंबर २०१६ रोजी भारतात रीलीज झालेला ‘एमएसजी-दी वॉरीअर लायन हार्ट’ (एमएसजी-मेसेंजर ऑफ गॉड) या सिनेमात राम रहीम सिंग याने सर्वाधिक ३० भुमिका निभावल्या होत्या.

एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने हे प्रमाणगत्र २१ ऑक्टोबर २०१६ रोजी राम रहीम सिंग यांना दिले होते. परंतु गुरूवारी हे प्रमाणपत्र राम रहीम सिंग यांच्या एका फॉलोअरने टि्वट केले. त्यावर अनेकांनी या टि्वटला रिटि्वट केले आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ३५ हजार लोकांनी प्रमाणपत्र शेअर केले होते. सकाळपासूनच #AsiaBookOfRecordsByStRamRahim, #stramrahimrecord हे दोन हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये आहेत.

 

राम रहीमच्या काही फॉलोअर्सने राम रहीमला मिळालेल्या इतरही अनेक प्रमाणपत्रांचे फोटोदेखील शेअर केले आहेत.

First Published on: May 24, 2018 8:43 AM
Exit mobile version