उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सिगारेटने शरीर जाळलं

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सिगारेटने शरीर जाळलं

मुलीवर ३० जणांनी केला रेप

उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस बळावत चालली आहे. लखीमपूर खेरी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणानंतर आता गोरखपूरमधील काही नराधमांनी क्रूरपणाची सर्व मर्यादा ओलांडली आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथील बेरहलगंज पोलीस स्टेशन परिसरातील बलसाडी या गावात एका १७ वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करत आरोपींनी पिडीत अल्पवयीन मुलीच्या शरीरावर सिगारेटने चटके देत तिला जाळले. दरम्यान, पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पीडित मुलीचे पालक मजूर म्हणून काम करतात. शनिवारी रात्री आठच्या सुमारास मुलगी आपल्या घरासमोर असलेल्या हातपंपवर पाणी भरण्यासाठी गेली होती. अर्जुन निषाद नावाचा आरोपी मित्रासह दुचाकीवरून आला आणि माझ्या मुलीचे तोंड दाबुन तिला घेऊन पळून गेला, असं पीडितेच्या वडिलांनी सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला, पण ती कुठेही सापडली नाही. रविवारी सकाळी काही जणांनी मुलगी डेहरीभारजवळ पाहिली. माहिती मिळताच मुलीचे कुटुंब घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या अल्पवयीन मुलीने संपूर्ण घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलीला गोला रुग्णालयात नेले, तेथून डॉक्टरांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

लखीमपूर खेरी येथे अल्पवयीन मुलीची बलात्कार करून क्रूरपणे हत्या

यापूर्वी एका १३ वर्षीय दलित मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या डोळ्यांसह शरीराच्या इतरही अवयव कापले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर विरोधक योगी सरकारवर सातत्याने हल्ले करत आहेत.


हेही वाचा – आत्मनिर्भरतेचा ढोल वाजवून आर्थिक संकट संपणार नाही – शिवसेना


 

First Published on: August 17, 2020 9:36 AM
Exit mobile version