चार प्रेमभंगांनंतर रतन टाटांचे आयुष्य बनले एकाकी…

चार प्रेमभंगांनंतर रतन टाटांचे आयुष्य बनले एकाकी…

फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याची अनेकजण नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात. 7 ते 14 फेब्रुवारी हा एक आठवडा संपूर्ण प्रेमींसाठी खास समजला जातो. आज जगभरातील लोक ‘व्हेलनटाईन डे’ म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा करत आहेत. याचं निमित्ताने आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास व्यक्तीची प्रेमकथा सांगणार आहोत. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा हे एक यशस्वी उद्योजक आहेत. एवढे मोठे उद्योगपती असूनही त्यांनी लग्न का केले नाही? असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडतो. मात्र, त्यांच्या तरुणपणी ते 4 वेळा प्रेमात पडले होते.

खरं तर, रतन टाटा यांनी एकही लग्न केले नाही. मात्र ते 4 वेळा प्रेमात पडले. पण त्यांचे एकही प्रेमप्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. काही वर्षांपूर्वी रतन टाटा यांनी स्वतः आपल्या प्रेमसंबंधांबद्दल भाष्य केले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्या आयुष्यात मी 4 वेळा प्रेमात पडलो. पण चारही वेळा काही संकटं आली ज्यामुळे प्रेम लग्नापर्यंत पोहचू शकले नाही.

रतन टाटा अमेरिकन तरुणीच्या पडले होते प्रेमात

1962 मध्ये ज्यावेळी भारत-चीन युद्ध सुरु होते. तेव्हा रतन टाटा अमेरिकेत काम करत होते. त्यावेळी ते तिथल्या मुलीच्या प्रेमात पडले होते. मात्र, काही कारणामुळे जेव्हा रतन टाटा भारतात आले. त्यानंतर सुरु असलेल्या युद्धामुळे त्यांची मैत्रिण भारतात येऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचे हे प्रेम प्रकरण फार काळ टिकले नाही. त्यानंतरही ते तीन वेळा प्रेमात पडले मात्र, ही देखील काही कारणास्तव पुढे जाऊ शकली नाहीत.

सिमी ग्रेवालच्या कार्यक्रमात सिमी ग्रेवाल यांच्याशी संवाद साधताना रतन टाटा म्हणाले की, “कधी-कधी त्यांना आयुष्यात एकटेपणा जाणवतो आणि एखाद्यासोबत राहून काय वाटेल असे वाटते. मात्र नंतर त्यांनी सांगितले की, “एक प्रकारे ते चांगले आहे कारण त्याला कोणाची चिंता करण्याची गरज नाही आणि सतत कोणाचाही विचार करण्याची गरज नाही. त्यामुळे ते त्यांच्या कामावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकतात.”


हेही वाचा :

राम चरणसोबत ‘RC 15’ टीमने दिल्या कियारा-सिद्धार्थला शुभेच्छा; व्हिडीओ व्हायरल

First Published on: February 14, 2023 2:17 PM
Exit mobile version