देशात कोरोना रुग्ण होत आहेत झपाट्याने बरे; रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण ४१.६१ टक्के

देशात कोरोना रुग्ण होत आहेत झपाट्याने बरे; रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण ४१.६१ टक्के

देशात समूह संसर्गास सुरुवात IMAचा इशारा

जगात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, दिलासादायक बातमी म्हणजे देशात कोरोना रुग्ण आता झपाट्याने बरे होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. मार्च महिन्यामध्ये ७.१ टक्के रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण होते. ते आता वाढून रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण ४१.६१ टक्के इतका झाला आहे.

६० हजार ४९० रुग्ण झाले बरे

देशातील कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहे. आतापर्यंत ६० हजार ४९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारत देशाची स्थिती चांगली असून मृत्यू दर देखील कमी आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या देखील इतर देशाच्या तुलनेत कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: May 26, 2020 6:11 PM
Exit mobile version