Forbesच्या उत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचा समावेश

Forbesच्या उत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचा समावेश

मुंबई – जगप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रिज ‘फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर रँकिंग 2022’ मध्ये 20 व्या स्थानावर पोहोचली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला फोर्ब्सने महसूल, नफा आणि बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम नियोक्ता (Best Employer) म्हणून घोषित केले आहे. (Reliance industries in top 20 in Forbes Best Employer Ranking 2022 )

टॉप-100 च्या यादीत भारतातून फक्त रिलायन्स अव्वल आहे. यानंतर HDFC बँक 137 व्या, बजाज 173 व्या, आदित्य बिर्ला ग्रुप 240 व्या, Hero MotoCorp 333 व्या, L&T 354 व्या, ICICI बॅंक 365 व्या, HCL टेक्नॉलॉजी 455 व्या स्थानावर आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये २.३ लाख कर्मचारी आहेत. कोका-कोला, मर्सिडीज, होंडा, यामाहा आणि सौदी अरामको यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या आधी रिलायन्सचा क्रमांक लागतो.

हेही वाचा – टाटांची नॅनो ते विमान भरारी : 14 वर्षांत महाराष्ट्राला दोनदा ‘टाटा’, गुजरातला पसंती

पहिल्या क्रमांकावर दक्षिण कोरियाची सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स

दक्षिण कोरियाच्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सला ‘फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर रँकिंग 2022’ मध्ये पहिले स्थान मिळाले आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, अल्फाबेट आणि अॅपल या अमेरिकन कंपन्यांची नावे आहेत. अमेरिकन कंपन्यांनी या क्रमवारीत 2 ते 12 वे स्थान मिळवले आहे. त्याचवेळी जर्मन ऑटो कंपनी बीएमडब्ल्यू ग्रुप 13 व्या, अॅमेझॉन 14 व्या आणि फ्रेंच कंपनी डेकॅथलॉन 15 व्या क्रमांकावर आहे.

फोर्ब्सने ही यादी तयार करताना आठशे कंपन्यांचा अभ्यास केला होता. मार्केट रिसर्च फर्म स्टॅटिस्टा यांच्या सहकार्याने त्यांनी हे रँकिंग तयार केले आहे. यासाठी ५७ देशांतील विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सुमारे दीड लाख कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधून हा अहवाल तयार केला आहे.

First Published on: November 7, 2022 2:03 PM
Exit mobile version