घरअर्थजगतटाटांची नॅनो ते विमान भरारी : 14 वर्षांत महाराष्ट्राला दोनदा 'टाटा', गुजरातला पसंती

टाटांची नॅनो ते विमान भरारी : 14 वर्षांत महाराष्ट्राला दोनदा ‘टाटा’, गुजरातला पसंती

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता टाटा एअरबसचा (Tata Airbus Project) एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. या प्रकल्पावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकारकडून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले जात आहे. तर, भाजपा व शिंदे गटाकडून मागील महाविकास आघाडी सरकारवर ठपका ठेवण्यात येत आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. (Shinde-Fadnavis Government) मात्र गेल्या 14 वर्षांत टाटांचा दुसरा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहे. त्यातही याचा फायदा गुजरातलाच झाला आहे.

यापूर्वी 2008मध्ये काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना टाटांचा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला होता. जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून टाटा नॅनो प्रकल्प ओळखला जातो. अनेक सर्वसामान्य कुटुंबीयांसाठी टाटांची नॅनो ही ड्रीम कार होती. ही कार जगातील सर्वात स्वस्त कार असल्याचा दावा कंपनीच्या माध्यमातून केला गेला. एक लाख रुपये किंमत असलेल्या टाटा नॅनोला भारतीय मध्यमवर्गीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -

या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या नावांची चर्चा होती. 2008मध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नॅनो गाडीच्या या प्रकल्पासाठी पश्चिम बंगाल राज्यावर शिक्कामोर्तब झाले. यासाठी टाटा समूहाने 18 मे 2006 रोजी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे अंदाजे 997 जमीनही नॅनो कार प्रकल्पासाठी प्रस्तावित केली होती. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचे सरकार होते. तर बुद्धदेव भट्टाचार्य हे मुख्यमंत्री होते.

भट्टाचार्य सरकारने या प्रकल्पासाठी सिंगूर, गोपालनगर, सिंगरभेरी, बरबेरी, खसेरभेरी आणि बाजेमेलिया या पाच गावांतील 9 हजारांहून अधिक शेतकऱ्यांकडून सुमारे 997 एकर जमीन घेण्याची योजना आखली होती. यापैकी 6 हजार शेतकऱ्यांनी जमीन देण्याच्या कागदपत्रावर सह्या केल्या. यात उर्वरित शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमीन काढून घेण्यात आल्या. या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. सध्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या प्रकल्पाविरोधात ममता बॅनर्जींनी मोठे आंदोलन छेडले होते.

- Advertisement -

परिणामी, ऑक्टोबर 2008मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी सिंगूरमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यानंतर गुजरातच्या साणंदमध्ये हा कारखाना उभारण्यात आला. त्यापाठोपाठ आता साधारपणे 14 वर्षांनी भारतीय हवाई दलासाठी C-295 विमान बनवण्याची जबाबदारी टाटा एअरबसवर सोपवण्यात आली आहे. कंपनी या विमानांची निर्मिती वडोदरा येथील प्रकल्पात करणार आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -