रिलायन्सचा दिवाळी धमाका; १०० टक्के कॅशबॅक ऑफर

रिलायन्सचा दिवाळी धमाका; १०० टक्के कॅशबॅक ऑफर

जिओ

सणासुदीला सुरुवात झाली का कंपन्यांच्या धमाकेदार ऑफरला देखील सुरुवात होते. अनेक कंपन्या वेगवेगळ्या ऑफर घेऊन ग्राहकांना आकर्षित करत असतात. विविध ऑफर्स देत ग्राहकांना फेस्टिव्ह सीजनमध्ये फायदा करुन देण्याचा प्रयत्न कंपन्यांचा प्रयत्न असतो. ई-कॉमर्स कंपन्यांच्या पाठोपाठ आता टेलिकॉम ऑपरेटर कंपनी रिलायन्सने देखील आपल्या लाडक्या ग्राहकांसाठी दिवाळी स्पेशल ऑफर आणली आहे. या नव्या प्लानमध्ये रिलायन्स ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक ऑफर देणार असून सर्वात स्वस्त असे प्लान देखील आणले आहेत.

जिओचा १ वर्षाचा प्लान

जिओचा एका वर्षाचा हा प्लान प्रिपेडकरता असून हा प्लान १ हजार ६९९ रुपयाचा आहे. या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड लोकल, एसटीडी कॉल्स आणि १०० एसएमएस मिळणार आहेत. हा प्लान घेतल्यास ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. जिओच्या या पॅकसोबत ग्राहकांना ५०० रुपयांचे तीन वाऊचर्स आणि २०० रुपयांचं एक वाऊचर मिळणार आहे. मात्र या कूपनच्या वापरासाठी किमान ५ हजार रुपयांची खरेदी करणे देखील गरजेचे आहे. तसेच रिलायन्सच्या अन्य प्लान्सवरदेखील १०० टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

जिओचा ऑफरला सुरुवात

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या ऑफरला सुरुवात झाली आहे. ही ऑफर १८ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. तसेच या ऑफरवर मिळाऱ्या कॅशबॅक कूपनचा वापर ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत करता येणार आहे. या ऑफरसाठी कंपनीने एक नवा प्लान आणला आहे. हा प्लान १ हजार ६९९ रुपयाचा असून हा लॉंग टर्म वॅलिडिटीचा प्लान आहे.

१०० टक्के कॅशबॅक बोनस

जिओने दिवाळीसाठी १०० टक्के कॅशबॅकची ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये १०० रुपयाच्या पुढील रिचार्ज असणार आहे. Rs. 149, 198, 299, 349,398,399,448,449,498,509,799,999,1699,1999,4999 आणि 9999 या रिचार्जमध्ये १०० टक्के कॅशबॅक परत मिळणार आहे.

कसा होणार कॅशबॅकचा फायदा

कॅशबॅकचा फायदा करुन घेण्यासाठी जिओचे रिजार्च १८ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत करणे गरजेचे आहे. ही कॅशबॅक जिओच्या कुपनवर मिळणार आहे. हे रिजार्च तुम्ही रिलायन्स डिजीटल आणि रिलायन्स डिजीटल एकस्प्रेस मिनी स्टोरमध्ये कमीत कमी ५ हजार पर्यंत खरेदी करु शकता.

वाचा – अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्सच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती

वाचा – रिलायन्सला फायदा होण्यासाठी पेट्रोल-डिझेलची दरवाढ – प्रकाश आंबेडकर

वाचा – वीज चोरणाऱ्यांवर रिलायन्स एनर्जीचे २०० एफआयआर

First Published on: October 19, 2018 10:56 AM
Exit mobile version