घरमुंबईअरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्सच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती

अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्सच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती

Subscribe

एसबीआयच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडिया लिमिटेड या उद्योग समुहाच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती झाली आहे.

एसबीआयच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडिया लिमिटेड या उद्योग समुहाच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती झाली आहे. रिलायन्स कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. रिलायन्स कंपनीच्या भागधारकांच्या मंजूरीनंतर त्यांनी पदाचा कार्यभार स्विकारला. १७ ऑक्टोबरला त्यांनी पुढच्या पाच वर्षासाठी रिलायन्स उद्योग समुहाच्या अतिरिक्त संचालक पदाचा कार्यभार स्विकारला.

एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्षा

१९७७ सालापासून अरुंधती भट्टाचार्य फायनान्सियल क्षेत्रात काम करत आहेत. अरुंधती भट्टाचार्य एसबीआय बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.२०१३मध्ये एसबीआयच्या अध्यक्ष बनलेल्या अरुंधती भट्टाचार्य २०१७मध्ये रिटायर झाल्या. आपल्या ४० वर्षाच्या करिअरमध्ये त्यांनी ट्रेजरी, रिटेल ऑपरेशन्स, फॉरेन एक्स्चेंज, इनवेस्टमेंट बँकिंग अशा विविध विभागांमध्ये काम केले आहे.

- Advertisement -

डीजीटल पेमेंट सुविधा वाढविण्यात आल्या

अरुंधती भट्टायार्य यांच्या कार्यकाळातच एसबीआय आणि रिलायन्स बँकेच्या माध्यमातून डिजीटल पेमेंट सुविधा वाढविण्यात आली. केंद्र सरकारकडून भ्रष्टाचारविरोधी संस्था लोकपालचे अध्यक्ष आणि त्याच्या सदस्यांच्या नावाची शिफारस करण्यासाठी आठ सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली या समितीमध्ये अरुंधती भट्टाचार्य देखील सहभागी आहेत.

शेतकरी संपावर केले होते वादग्रस्त वक्तव्य

शेतकरी संपावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन अरुंधती यांनी वादग्रस्त विधान केले होते. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास देशातील कर्जवाटप आणि वसुलीच्या शिस्तीला मोठा धक्का बसेल आणि भविष्यात हा पायंडाच पडून जाईल,’ असे वक्तव्य अरुंधती भट्टाचार्य यांनी केले होते. त्यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका झाल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -