घरमुंबईवीज चोरणाऱ्यांवर रिलायन्स एनर्जीचे २०० एफआयआर

वीज चोरणाऱ्यांवर रिलायन्स एनर्जीचे २०० एफआयआर

Subscribe

मुंबई उपनगरात सतत वीजचोरी करणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी रिलायन्स एनर्जीचीने वीजचोरी विरोधात मोहिम चालू केली आहे. या मोहिमेत कंपनीने २०१७-१८ मध्ये ५८३ ग्राहकांविरोधात २०० एफआयआर नोंदविले आहेत. गेल्या वर्षी २०१६-१७ मध्ये १२० प्रकरणात ४११ ग्राहकांच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावर्षी यामध्ये ६६ टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली. शिवाजीनगर, चित्ता कॅम्प, ट्रॉम्बे, मानखुर्द, भेरामपाडा, जुहू लेन, मालवण या विभागांमध्ये वीजचोरीचे प्रमाण मोठे आहे. या ठिकाणी अवैधरित्या वीज व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिलायन्स एनर्जीचा दक्षता विभाग पोलिसांच्या मदतीने सातत्याने छापे घालत आहे. वितरण जाळ्यातून अवैधरित्या वायर टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत चोरी करण्यासाठी वापरत असलेली उपकणेही जप्त केली आहेत. यामुळे २९०० वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये ५१ टन अवैध वायर्स जमा करण्यात आले आहेत. गुन्हेगारांनी न्यायालयीन कारवाई पासून वाचण्यासाठी बाहेरच याचा निकाल लावला असून कंपनीला १४.६३ कोटींचा दंड प्राप्त झाला आहे. उर्वरित २०० प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

ऑगस्ट २०१७ मध्ये, चेंबुर, शिवाजी नगर पोलीस ठाण्याने प्रथमच वीजचोरी आणि विजेचे अवैध वाटप करणाऱ्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का ) लागू केला होता. त्यांच्या विरोधात आधीच पोलीस ठाण्यात २४ प्रकरणे दाखल होती.

“वीज चोरीवर आळा बसावा म्हणून पोलिसांच्या मदतीने आमचे दक्षता पथक अधुनमधुन या विभागात अचानक छापे घालते. तसेच गुन्हेगाराला कायद्याची जरब बसवून कायदेशीर आणि अवैधरित्या वापरात आणलेली वायर्स जप्त करते. वीजचोरी हा धोकादायक आणि कायदेशीर गुन्हा आहे. एखादी व्यक्ती जिवंत वायर्सच्या संपर्कात आली तर त्याची जीवितहानी होण्याची शक्यता असते. शिवाजी नगर पोलीस ठाण्याने सतत वीजचोरी करत असलेल्या गुन्हेगारांवर मोक्का लावला ही उल्लेखनीय बाब आहे, अशी प्रतिक्रिया रिलायन्स एनर्जीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

- Advertisement -

एफआयआर दाखल झालेली विभागवार माहिती

  • पूर्व विभाग (कुर्ला-मानखुर्द/विक्रोळी) – ३३३ ग्राहकांविरुद्ध ६३
  • मध्य विभाग (गोरेगाव-कांदिवली) – ८० ग्राहकांविरुद्ध ४१
  • पश्चिम विभाग (वांद्रे-विलेपार्ले) – ७५ ग्राहकांविरुद्ध ४१
  • पश्चिम मध्य विभाग (अंधेरी-जोगेश्वरी) – ८० ग्राहकांविरुद्ध ४०
  • उत्तर विभाग (बोरीवली-भाईंदर) – १८ ग्राहकांविरुद्ध १५

पायाभूत सेवेवर पडणारा बोजा
काही झोपडपट्ट्या क्षेत्रांमध्ये विजेची मागणी जास्त आहे आणि जागेच्या अभावामुळे नवीन वीज वितरण जाळे टाकणे अशक्य आहे. वीज चोरीमुळे वितरण जाळयावर दाब आल्यामुळे देखरेखीचा खर्च वाढतो. तसेच, केबल्स आणि ट्रान्सफॉर्मर हे जास्त दाबामुळे बिघडते आणि त्याच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च वाढतो.

वीज सर्वांसाठी
रिलायन्स एनर्जीचे एकूण ३० लाख ग्राहक आहेत. त्यातील १/३ म्हणजे १० लाख ग्राहक हे झोपडपट्टीतील आहेत. रिलायन्स एनर्जी ही भारतातील वीजवितरण क्षेत्रांतील अग्रगण्य कंपनी आहे, जी उपनगरात ४०० चौ. किमी मध्ये पसरलेल्या ३० लाख ग्राहकांना वीज पुरवठा करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -