Republic Day: देशाची शान, वीरांचे शौर्य आणि फायटर जेटचा थरार—कर्त्यव पथावर रंगला ऐतिहासिक सोहळा

Republic Day: देशाची शान, वीरांचे शौर्य आणि फायटर जेटचा थरार—कर्त्यव पथावर रंगला ऐतिहासिक सोहळा

देशभरात आज २६ जानेवारीला ७४ वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्त्यव पथावर, विविध राज्यातील चित्ररथांबरोबरच देशाच्या तिन्ही दलांनी परेड केली. मात्र यावेळचा प्रजासत्ताक सोहळा वेगळा ठरला. कारण यावेळी राज्यांच्या चित्ररथांमधून नारीशक्तीचाच गजर करण्यात आला होता. त्याचबरोबर भारताच्या तिन्ही दलाच्या वीरांच्या अफाट साहसाचीही यावेळी देशवासियांना झलक बघायला मिळाली.

आकाश मिसाईल, अर्जुन टॅंक, राफेल

यासोहळ्यात कर्त्यव पथावर आकाश मिसाईल, युद्धात वापरले जाणारे अर्जुन टॅंक यासारखी यु्द्धसामग्रीच आणि वाहनांचा ताफाच राजपथावर उतरला होता. यावेळी आकाशात प्रचंड आणि राफेल या वायुदलाच्या लढाऊ विमानांसह ५० विमानांनी केलेले प्रदर्शन बघून उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला. तिन्ही दलाची शान आणि मानाबरोबरच भारताची ताकदच या कसरतींमधून जगाला पाहायला मिळाली. तर ९० मिनिटांच्या या परेडमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांचे २३ चित्ररथ मोठ्या डौलाने सहभागी झाले होते. यावेळी नारीशक्तीची झलक .यातून पाहायला मिळाली.

भारताच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आज, गुरुवारी संचलन झाले.

२१ तोफांची सलामी

याप्रसंगी कर्त्यव पथावर पहील्यांदाच देशाने एक इतिहास रचला. यावेळी देशात पहील्यांदाच आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परेडमध्ये सलामी घेतली. त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर २१ तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीत झाले. मुर्मू यांनी यावेळी देशाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल सीसी (Abdel Fattah El-Sisi) यांना आमंत्रित करण्यात आले होते.

प्रजासत्ताक दिन सोहळा सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉर मेमेरियल मध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहीली. त्यानंतर मोदी आपल्या ताफ्यासह कर्त्यव पथावर पोहचले. नंतर त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत केले. सकाळी १०.३० ला हा सुरू झालेला हा सोहळा ९० मिनिटांचा होतो. त्यानंतर परेड सलामी झाली. या परेडचे नेतृत्व कमांडर , लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी केले.

 

यावेळी पहील्यांदाच इजिप्तचे सैन्य दलही या परेडमध्ये सहभागी झाले होते. कर्नल महमूद मोहम्मद अब्देल फत्ताह एल खारासावी यांच्या नेतृत्वाखाली ही परेड झाली. इजिप्तच्या या दलात १४४ सैनिकांनी सहभाग घेतला होता. तर भारताच्या सैन्य दल, वायू दल आणि नौदलाने या परेडमध्ये सहभाग घेतला होता.

First Published on: January 26, 2023 4:43 PM
Exit mobile version