निवडणुकीनंतर पहिल्यांदा मोदींची ‘मन की बात’

निवडणुकीनंतर  पहिल्यांदा मोदींची ‘मन की बात’

'मन की बात'

जनतेशी थेट संवाद साधता यावा यासाठी सुरू करण्यात आलेला पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा देशवासीयांच्या भेटीला येत आहे. आजपासून या कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. दर महिन्याच्या अखेरच्या दिवशी रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत असतात. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच मन की बातकार्यक्रम असणार आहे.

मन की बातमधून साधणार संवाद

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली. यावेळी सुरू केलेल्या ‘मन की बात’ मधून देशातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधला होता. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारला आहे. आजपासून पुन्हा एकदा मन की बातच्या दुसऱ्या मालिकेतील पहिला भाग प्रसारित होणार आहे. देशात नवे सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पुन्हा हा कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर या कार्यक्रमाचे ५३ भाग प्रसारित झाले होते. मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील अखेरचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता आणि आज पुन्हा एकदा मोदी मन की बातमधून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

मन की बात’मधून उत्कृष्ट अनुभव

‘मन की बात’च्या पहिल्या पर्वाचा शेवटचा भाग २४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमामुळे उत्कृष्ट अनुभव मिळाल्याची भावना व्यक्त केली होती.


हेही वाचा – मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल! अजितदादांची ‘मन की बात’

हेही वाचा – मोदी मन की बात करत होते मात्र त्यांच्या मनात धन की बात होती – उदयनराजे


First Published on: June 30, 2019 10:07 AM
Exit mobile version