विवाह सोहळ्यातून निर्माण होतोय कोरोनाचा सर्वाधिक धोका – तज्ज्ञ

विवाह सोहळ्यातून निर्माण होतोय कोरोनाचा सर्वाधिक धोका – तज्ज्ञ

देशात कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा झपाट्याने होताना दिसत आहे. मुंबईतील अनेक भाग कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल करताच अनेक कामे पूर्वपदावर आली. २०२०मध्ये रकडलेली लग्ने लावण्याकडे लोकांचा कल वळला. या काळात अनेक लग्ने झाली. त्यातही कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येत्या काळात लग्न करणाऱ्यांनी सर्वात जास्त काळजी घ्या असे सांगण्यात आले आहे. पुढील काही महिन्यात अनेक लग्नाचे मुहूर्त आहेत. येणाऱ्या काळात लग्न मोसमात कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

लग्न सराईच्या काळात कोरोनाचा सर्वात जास्त धोका जावणत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. उत्तर भारतात प्रामुख्याने याचा धोका संभवतो. त्यामुळे या काळात प्रामुख्याने सोशल डिस्टन्सिंग त्याचबरोबर दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला सातत्याने या गोष्टींचा विसर पडलेला दिसून येतो. कोरोना महामारीच्या विषाणूच्या बाबतीत आपण सतत जागृक राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे निती आयोगाचे सदस्य डॉक्टर विके पाउल यांनी सांगितले.

लोकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी अनेक सूचना देण्यात येत आहेत. मात्र नागरिक त्यांना नेहमी गृहित धरताना दिसत आहेत. इंडिया काऊन्सिल अँड मेडिकल रिसर्चच्या सर्वेनुसार ७० टक्के भारतीय हे असुरक्षित आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोविड १९चे योग्य पालन केल्यानंतरही गेल्या काही महिन्यांमध्ये सार्स कोव्ह २ च्या अनेक केसेस समोर आल्या. भारतामध्ये अशाप्रकराच्या १८७ केसेस समोर आल्या होत्या. ४ केसेस साउथ आफ्रीका आणि १ केस ब्राझीलमधून समोर आली होती. मात्र साउथ आफ्रीका आणि यूके मधील प्रकार हा थोडा वेगळा आढळून आला होता.

गेली अनेक दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे, पार्ट्या, सामुहिक कार्यक्रम सुरु झाले आहेत. बऱ्याच विवाह सोहळ्यातही अनेक जण कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळले आहेत. बऱ्याच केसेसमध्ये नवरा नवरी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – सुरक्षा दर्जाचा खर्च निश्चित करणे अवघड, गृहमंत्रालयाने दिले उत्तर

First Published on: February 17, 2021 5:18 PM
Exit mobile version