मोहन भागवतांशी आमची भेट कौटुंबिक होती, मिथुन चक्रवर्तीचे स्पष्टीकरण

मोहन भागवतांशी आमची भेट कौटुंबिक होती, मिथुन चक्रवर्तीचे स्पष्टीकरण

मोहन भागवतांशी आमची भेट कौटुंबिक होती, मिथुन चक्रवर्तीचे स्पष्टीकरण

पश्चिम बंगलाच्या निवडणूकींच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. मुंबई येथे दोघांनी एकमेकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आता त्यांच्या भेटीच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी सकाळीच मिथुन चक्रवर्ती यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी हजेरी लावली. याआधीही मिथुन चक्रवर्ती यांनी मोहन भागवत यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. बंगाल विधानसभा निवडणूकीच्या मुहूर्तावर मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या भेटीमुळे अनेक चर्चा आणि प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र मोहन भागवत यांच्यासोबत घेतलेली भेटी ही कौटुंबिक होती. त्याचे कोणतेही अर्थ काढू नये असे मिथुन चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले आहे.

मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या भेटीविषयी बोलताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, मी त्यांच्याशी अध्यात्माशी जोडलो गेलो आहे. लखनऊमध्ये माझी त्यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर मी त्यांना माझ्या मुंबईच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. आम्हाला खूप दिवसांपासून भेटायचे होते पण आमच्या कामांमुळे वेळ मिळत नव्हता. आमच्या भेटीचे कोणतेही अर्थ लावू नये. आमची भेटही कौटुंबिक होती, असे मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात खासदारकीसाठी मिथुन चक्रवर्ती यांना मोहन भागवतांच्या माध्यमातून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ही भेट कौटुंबिक असल्याचे मिथुन चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले आहे. मात्र बंगलाच्या निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला एक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

बंगालमध्ये जन्मलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे बॉलिवूड कलाकार ते एक सामाजिक कार्यकर्ता ते राजकिय नेता असा त्यांचा प्रवास आहे. मिथुन चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे आधी खासदार होते. मात्र त्यांच्या सतत गैरहजर राहण्याने त्यांनी स्वत:हूनच खासदारकीचा राजीनामा दिला. मोहन भागवत यांच्या मार्फत मिथुन चक्रवर्ती यांना भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा – ‘अमित शाह नेपाळ आणि श्रीलंकेतही भाजपाचे सरकार आणणार’ त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

 

First Published on: February 16, 2021 5:16 PM
Exit mobile version