कॉलेजमधील प्रेम प्रकरण, बंगळुरूत भारतीय पद्धतीने लग्न; ऋषी-अक्षताची लव्हस्टोरी वाचाच

कॉलेजमधील प्रेम प्रकरण, बंगळुरूत भारतीय पद्धतीने लग्न; ऋषी-अक्षताची लव्हस्टोरी वाचाच

भारतीय वंशाचे ऋषि सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. ४२ वयाच्या ऋषि सुनक पंतप्रधान पदाच्या शर्यतीत बाजी मारल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ते मुळचे भारतीय असल्याने भारतीयांनाही त्यांचा अभिमान वाटत आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या त्यांचीच चर्चा सुरू आहे. यादरम्यान, ऋषि सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे.

ऋषी सुनक यांचा जन्म १२ मे १९८० रोजी युकेतील साउथम्पटन येथे झाला. त्यांच्या आईचे नाव उषा सुनक आणि वडिलांचे नाव यशवीर सुनक होते. तीन भावंडांमध्ये ऋषि सुनक सर्वात मोठे. त्यांचे आजोबा पंजाबचे होते. 1960 मध्ये, ते आपल्या मुलांसह पूर्व आफ्रिकेत गेले. पुढे त्यांचे कुटुंब येथून इंग्लंडला गेले. तेव्हापासून सुनकचे संपूर्ण कुटुंब इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहेत. भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी ऋषी यांचे लग्न झाले आहे. सुनक आणि अक्षता यांना दोन मुली आहेत. अनुष्का सुनक आणि कृष्णा सुनक अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत.

हेही वाचा – भारतावर राज्य करणाऱ्या युकेला मिळाले भारतीय वंशाचे पंतप्रधान, मोदींकडून ऋषी सुनक यांचे अभिनंदन

ऋषि सुनक यांनी विनचेस्टर कॉलेजमध्ये त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं. पुढील शिक्षण त्यांनी ऑक्सफर्डमधून घेतलं. २००६ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड युनिर्व्हसिटीमधून एमबीएची डिग्री प्राप्त केली. स्टॅनफोर्ड विद्यापीठात अक्षता मूर्ति यांच्याशी भेट झाली आहे. अक्षता मूर्ती या इन्फोसिसचे संस्थापक एन.नारायणमूर्ति यांची कन्या आहेत. अभ्यास करत असतानाच ते एकमेकांना भेटले. त्याचवेळी एकमेकांचं प्रेम जडलं. २००९ साली दोघांनी बंगळुरू येथे भारतीय पद्धतीनुसार लग्नही केलं. अक्षता इंग्लडमध्ये आपला फॅशन ब्रॅण्ड सांभाळत आहेत. तर, त्यांचा इंग्लडमधील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत समावेश आहे.

ऋषी सुनक यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. 2015 मध्ये त्यांनी रिचमंडमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. 2017 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. यानंतर 13 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांना इंग्लंडचे अर्थमंत्री बनवण्यात आले. त्याच वर्षी जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर सर्व प्रकारचे आरोप झाले तेव्हा ऋषी सुनक यांनी राजीनामा दिला. यानंतर जॉन्सन मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी सातत्याने राजीनामा दिला. यानंतर नव्या पंतप्रधानांच्या निवडणुकीला सुरुवात झाली.

हेही वाचा – पंजाब ते इंग्लंड… भारतीयांचा गौरव असलेल्या सुनक कुटुंबाचा प्रवास

First Published on: October 25, 2022 2:56 PM
Exit mobile version