घरदेश-विदेशपंजाब ते इंग्लंड... भारतीयांचा गौरव असलेल्या सुनक कुटुंबाचा प्रवास

पंजाब ते इंग्लंड… भारतीयांचा गौरव असलेल्या सुनक कुटुंबाचा प्रवास

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली होती. परंतु अखेर हे पद त्यांना मिळालेच. त्यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी आज, सोमवारी निवड झाली आहे. ते ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले आहेत. जगभरातील भारतीय दिवाळी साजरी करत असताना त्यांच्या या निवडीमुळे या उत्सावातील गोडवा अधिकच वाढला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेले ऋषी सुनक कोण आहेत? ते इंग्लंडमध्ये कधी स्थायीक झाले? याची माहिती देखील रंजक आहे.

सुनक कुटुंब हे मूळचे पंजाबचे. 1960मध्ये हे कुटुंब पूर्व आफ्रिकेत गेले आणि त्यानंतर ते इंग्लंडला स्थायिक झाले. ऋषी सुनक यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथम्प्टनमध्ये झाला. त्यांच्या आई-वडिलांचे नाव उषा आणि यशवीर सुनक होते. तीन भावंडांमध्ये ते सर्वात मोठे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी ऋषी यांचा विवाह झाला आहे. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. अनुष्का आणि कृष्णा अशी त्यांची नावे आहेत.

- Advertisement -

इंग्लंडमधील विंचेस्टर कॉलेजमध्ये ऋषी सुनक यांचे प्रारंभीचे शिक्षण झाले. तर पुढील शिक्षण ऑक्सफर्डमधून केले. 2006मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी त्यांनी मिळवली. याचदरम्यान त्यांची अक्षता मूर्ती यांची भेट झाली. आधी मैत्री आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 2009मध्ये दोघांनी बंगळुरूमध्ये भारतीय पद्धतीने लग्न केले. अक्षता यांचा इंग्लंडमध्ये स्वतःचा ‘अक्षता डिझाइन्स’ फॅशन ब्रँड आहे. इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये त्यांचा समावेश होतो.

- Advertisement -

ऋषी यांच्यात आधीपासूनच कमालीचा आत्मविश्वास आहे. 2009मध्ये त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 2013मध्ये, त्यांची आणि अक्षता यांची व्हेंचर कॅपिटल कंपनी कॅटामारन व्हेंचरच्या संचालक म्हणून नियुक्ती झाली. या कंपनीची स्थापना एन. नारायण मूर्ती यांनी केली आहे. 2015मध्ये ऋषी सुनक यांनी फर्मचा राजीनामा दिला, परंतु अक्षता या कंपनीशी संलग्न राहिली.

आठ वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश
ऋषी सुनक यांनी साधारणपणे आठ वर्षांपूर्वी म्हणजेच 2014मध्ये राजकारणात प्रवेश केला. 2015मध्ये त्यांनी रिचमंडमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. 2017मध्ये त्यांनी पुन्हा एकदा विजयी झाले. यानंतर 13 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांच्याकडे इंग्लंडचे अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. 2022मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे वादात अडकल्यानंतर अर्थमंत्री ऋषि सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी जुलैमध्ये राजीनामा दिला. चार मंत्र्यासह 40 जणांनी राजीनामे दिल्याने नव्या पंतप्रधानांच्या निवडणुकीला सुरुवात झाली. यामध्ये ऋषी सुनक हे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले.

ऋषी सुनक आणि लिज ट्रस यांच्यात खऱी लढत झाली. त्यात लिझ ट्रस यांनी बाजी मारली आणि त्या पंतप्रधान झाल्या. पण अवघ्या 45 दिवसांत त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्याने ऋषी सुनक नवे पंतप्रधान झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -