सलमानला चाहत्याचा मोबाईल खेचणे पडलं महाग, गोव्यात ‘नो एन्ट्री’ ची मागणी

सलमानला चाहत्याचा मोबाईल खेचणे पडलं महाग, गोव्यात ‘नो एन्ट्री’ ची मागणी

नोटबुक चित्रपटाच्या गाण्यामुळे सलमान झाला ट्रोल

बॉलीवूडचा दंबगस्टार सलमान खान आणि त्याचा सनकी स्वभाव हे काही चाहत्यांना नवीन नाही. पण त्याचा हाच सणकी स्वभाव त्याला चांगलाच महागात पडणार आहे. गोवा विमानतळावर मंगळवारी सलमानबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न एका चाहत्याने केला. यामुळे चिडलेल्या सलमानने त्याचा मोबईलच खेचून घेतला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अशा हिंसक अभिनेत्याला गोव्यात प्रवेश बंदी करण्यात यावी अशी मागणी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडीयाने केली आहे. सध्या राधे चित्रपटाचे गोव्यात शूटींग सुरू आहे. सलमान यात प्रमुख भूमिका करत असून मंगळवारी तो शूटींगसाठी गोव्यात आला. विमानतळावर सलमान दिसताच चाहत्यांनी त्याला गराडाच घातला. पण सलमानच्या अंगरक्षकांनी सगळ्यांना दूर करत त्याला वाट करून दिली. तरीही एक चाहता सलमानबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. हे बघताच सलमानची सटकली व त्याने चाहत्याच्या हातातून मोबाईलच खेचून घेतला व विमानतळाबाहेर पडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. याचपार्श्वभूमीवर NSUI चे अध्यक्ष अहराज मुल्ला यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहले आहे. त्यात चाहत्याचा अपमान करणाऱ्या सलमानला जाहीर माफी मागण्यास सांगावी. तसेच या कुप्रसिद्ध अभिनेत्याला गोव्यात प्रवेश बंदी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. NSUI बरोबरच माजी खासदार आणि भाजपचे गोवा सेक्रेटरी नरेंद्र सावईकर यांनीही सलमानचे हे वर्तन योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी सलमानचा विमानतळावरील व्हिडीओही टि्वट केला आहे. सेलेब्रिटी असल्याने चाहते तुमच्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी सेल्फी घेणारच. पण तुझे वर्तन मात्र अयोग्य आहे. यामुळे तुम्ही माफी मागायला हवी असे सलमानला उ्ददेशून टि्वट केले आहे.
First Published on: January 29, 2020 12:22 PM
Exit mobile version