पत्र, मुलाखतीनंतर सलमानला आता या माध्यमातून मिळाली धमकी…; गुन्हा दाखल

पत्र, मुलाखतीनंतर सलमानला आता या माध्यमातून मिळाली धमकी…; गुन्हा दाखल

सलमान खान गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट समोर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

 

मुंबईः अभिनेता सलमान खानला आता ई-मेल द्वारे धमकी मिळाली आहे. गेल्या वर्षी सलमानला पत्राद्वारे धमकी मिळाली होती. तर गेल्याच आठवड्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलमानला धमकी वजा इशारा दिला होता. वर्षभरात सलमानला तिसऱ्यांदा धमकी आली आहे. पोलिसांत याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पंजाबमधील गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या झाल्यानंतर सलमानला धमकीचे पत्र मिळाले होते. तुझाही मुसेवाला करु अशी धमकी या पत्रात देण्यात आली होती. सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्याला पिस्तुल बाळगण्याचा परवानाही देण्यात आला होता. हे पत्र ज्याच्या माध्यमातून आले त्या गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईची एका वृत्त वाहिनीने मुलाखत घेतली. या मुलाखतीत बिश्नाेईने सलमानला धमकी वजा इशारा दिला.  सलमानने काळवीट शिकार प्रकरणात चूक केली आहे. आमच्या समाजाचा त्याने अपमान केला आहे. मला काही समाजाने पाठिंबा दिलेला नाही. मात्र त्याने माफी मागणे अपेक्षित आहे. ही धमकी न समजता विनंती समजून सलमानने माफी मागावी, असा इशारा बिश्नोईने त्या मुलाखतीत दिला होता.

या धमकीमुळे सलमानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ करण्यात आली. धमकीचे हे प्रकरण ताजे असतानाच सलमानच्या कार्यालयात धमकीचा मेल आला आहे. सलमानच्या कर्मचाऱ्याला हा धमकीचा मेल आला आहे. या मेलम्ध्ये सलमानला धमकी देण्यात आली आहे. गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से. इंटरव्ह्यू (लॉरेन्स बिश्नोई) देख लिया होगा उसने. अगर नही देखा तो बोल देना देख लेगा. मॅटर क्लोज करना है तो बात करवा दियो. फेस टू फेस करना है तो बता दियो. अभी टाइम रहते इन्फॉर्म कर दियो, अगली बार बडा झटका देंगे” असा इमेल पाठवण्यात आला आहे. rohitgarg<rg6338615@gmail.com> या आयडीवरून हा मेल पाठवण्यात आला आहे. पोलिसांत याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याची चौकशी करत आहेत.

First Published on: March 19, 2023 2:58 PM
Exit mobile version