समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची प्रकृती खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची प्रकृती खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

National news Azam Khan hate Speech case BJP MLA Rampur court samajwadi Party leader

मुंबई | नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान (Azam Khan) यांची प्रकृती खालवली आहे. यानंतर आझम खान यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या आझम खान यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आझम खान यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सर गंगाराम रुग्णालयाच्या उपाध्यक्ष डॉ. बीबी अग्रवाल यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली.

आझम खान हे उत्तर प्रदेशाच्या सीतापूर तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आझम खान यांच्यावर ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. “आझम खान यांची प्रकृती सोमवारी अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लवकरच त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया होणार आहे”, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेला दिली.

उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून आझम खान हे १० वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आझम खान यांनी द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यामुळे आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले.

आझम खान यांचे वादग्रस्त वक्तव्य

आझम खान यांनी २५ जुलै २०१९ रोजी लोकसभेत तिहेरी तलाकविषयी चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान लोकसभा अध्यक्ष रमादेवी यांना संबोधून आझम खान यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावेळी आझम खान म्हणाले, “आप मुझे इतनी अच्छी लगती है की मेरा मन करता है की आप की आखों में आँखे डाले रहूँ”, असे वक्तव्य केले होते. आझम खान यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेत गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर आझम खान यांनी रमादेवी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल लोकसभेत माफी देखील मागितली होती.

उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजपच्या नेत्या जया प्रदा यांच्यावर देखील आझम खान यांनी अश्लील शब्दात टीका केली होती. या प्रकरणाची दखल निवडणूक आयोगाने घेतली होती. यानंतर आयोगाने आझम खान यांच्यावर ७२ तासांची प्रचारबंदीची कारवाई केली होती. आझम खान यांच्या वक्तव्यावर जया प्रदा यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, “आझम खान यांचे वक्तव्य माझ्यासाठी काही नवीन नाही. २००९ साली मी समाजवादी पार्टीची उमेदवार होते. त्यावेळी आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. परंतु, यावेळी मला कुणी पाठिंबा दिला नाही. मी एक महिला आहे आजम खान जे बोलू शकतात, ते मी बोलू शकत नाही. मी त्यांचे काय वाईट केले आहे ते मला माहित नाही. परंतु, ते वारंवार माझ्यावर अशा शब्दांमध्ये टीका करत असतात.”

 

 

 

First Published on: April 18, 2023 9:50 AM
Exit mobile version