चीनमध्ये नाही तर SAMSUNG ला करायची आहे भारतात गुंतवणूक!

चीनमध्ये नाही तर SAMSUNG ला करायची आहे भारतात गुंतवणूक!

Samsung ला मोठा धक्का! Galaxy चा सोर्स कोर्डसह 190 GB डेटा हॅकर्सकडून लीक

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने उत्तर प्रदेशमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ दक्षिण कोरियन कंपनी असणाऱ्या सॅमसंगने उत्तर प्रदेशमध्ये ५३.६७ बिलियन रुपये म्हणजेच ५ हजार ३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भातील करारांवर २०१९ च्या शेवटी सरकार आणि कंपनी दोघांकडूनही स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

१३०० जणांना रोजगार

या कंपनीमुळे १३०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. इनव्हेस्ट इंडिया या मोहिमेअंतर्गत केंद्राने उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. इनव्हेस्ट इंडिया या मध्यस्थी करणाऱ्या आणि परदेशी गुंतवणूक आणण्याचं काम करणाऱ्या खात्याने  उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या सॅमसंगच्या कारखान्यासंदर्भातील पत्राचा रॉयटर्सने हवाला दिला आहे. हा प्रकल्प २०२१ पासून सुरु होणार आहे.

इन्व्हेस्ट इंडियाला पत्र

“आम्ही उत्तर प्रदेशमधील हायटेक उद्योगांच्या स्थापनेस चालना देण्यासाठी आणि मुख्य गुंतवणूकदार म्हणजेच सॅमसंग डिस्प्लेचे कामकाज भारतात सुरु करण्यासाठी देता येतील अशा सोयींसंदर्भात आमच्या शिफारसी सादर करीत आहोत.” २० वर्षांच्या कालावधीत एकूण गुंतवणूकीवर उच्च भांडवली प्रोत्साहन मिळवून सॅमसंगला फायदा होऊ शकेल असंही इन्व्हेस्ट इंडियाने पत्रात म्हटले आहे

या पत्रामधील मुद्द्यांचा विचारांचा विचार केला जात आहे आणि अद्याप यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही असं उत्तर प्रदेशचे औद्योगिक विकास मंत्री सतीश महाना म्हणाले आहेत.  २००९ मध्ये स्थापन केलेला इन्व्हेस्ट इंडिया हा भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत सुरु करण्यात आलेला इन्व्हेस्ट इंडिया हा ना नफा ना तोटा या आधारावर सुरु करण्यात आलेला करणारा उपक्रम आहे, असं वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वेबसाईटवर म्हटले आहे.


हे ही वाचा – धक्कादायक! वाघीण आणि तीच्या २ बछड्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं!


 

First Published on: June 18, 2020 10:14 AM
Exit mobile version