CoronaVirus: सौदी अरेबियाच्या ‘या’ निर्णयामुळे लाखो भारतीय येणार अडचणीत

CoronaVirus: सौदी अरेबियाच्या ‘या’ निर्णयामुळे लाखो भारतीय येणार अडचणीत

CoronaVirus: सौदी अरेबियाच्या 'या' निर्णयामुळे लाखो भारतीय येणार अडचणीत

संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या महामारीमुळे आर्थिक संकट उद्भवणार आहे. सौदी अरेबियला देखील या आर्थिक संकटांशी सामना करावा लागणार आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. परंतु येणाऱ्या काळात सौदी अरेबियातील लोकांचे जीवन कठीण होणार आहे. दरम्यान आता सौदी अरेबिया खासगी क्षेत्रातील कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे वेतन ४० टक्के कपात करण्याची परवानगी देणार आहे. माहितीनुसार, आर्थिक संकट लक्षात घेता सौदी अरबमध्ये काम करत असलेल्या लोकांचे करारदेखील रद्द केले जाऊ शकतात. सौदी अरबमध्ये २६ लाख भारतीय राहतात. या निर्णयाचा त्याच्यावर देखील मोठा परिणाम होणार आहे.

सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाने कामगार कायद्यात बदल करण्यास सहमती दर्शविली आहे. या बदलानंतर कंपनी पुढील सहा महिन्यांतील कर्मचाऱ्यांचे वेतन ४० टक्के कपात करणार आहे. या नवीन नियमांतर्गत कंपन्यांना सहा महिन्यानंतर कंपनींना कर्मचाऱ्याचे करार रद्द करण्याचा अधिकारही असेल. करार रद्द करण्यासाठी तीन अटी देखील ठेवल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाला सौदी अरेबिया सरकारने अद्याप मान्यता दिली नाही आहे. पण सरकारने मान्यता दिल्यानंतर याची अंमलबजावणी होईल, असं सांगण्यात आलं आहे.

या अगोदर सौदी अरेबियाचे भारतीय राजदूत डॉ. औसाफ सय्यद यांनी असं स्पष्ट केलं होत की, आखाती देशातील भारतीयांची नोकरी जाऊ शकते. त्यामुळे भारतीयांचे खूप नुकसान होणार आहे.


हेही वाचा – रैनासाठी भारतीय संघाचे दरवाजे कसे बंद झाले?, याचा एमएसके प्रसाद यांनी केला खुलासा


 

First Published on: May 5, 2020 7:22 PM
Exit mobile version