‘या’ बँकेचे ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले: जाणून घ्या नियम अन्यथा…

‘या’ बँकेचे ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले: जाणून घ्या नियम अन्यथा…

1 St April these rule will cahnge

पैसे काढण्यासाठी नियमित एटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल झाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएएममधून येणारे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसबीआय एटीएम (SBI ATM) काढण्यासाठी OTP गरजेचा असणार आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. त्यामुळे या बँकेच्या नियमातील बदल ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे. या नव्या नियमांनुसार, ग्राहकांना आटोपीशिवाय पैसे काढू शकत नाही, रोख रक्कम काढतेवेळी ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकल्यानंतरचं एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढायचे झाल्यास ग्राहकांना ओटीपीटी गरज लागणार आहे. ओटीपीमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे ओटीपीच्या माध्यमातून पैसे काढण्यास प्राधान्य दिले जाते.

बँक व्यवहारातील वाढती फसवणूक लक्षात घेत अशाप्रकारे सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. स्टेट बँक त्यांच्या ग्राहकांसाठी वेळोवेळी अशा सेवेची घोषणा करत असतात. जेणेकरून त्यांचे व्यवहार सुरक्षित आणि सुलभ व्हावेत. ओटीपीद्वारे पैसे काढणे हा देखील त्याचा भाग आहे. यासाठी बँक अकाऊंटला नोंद असलेला मोबाईल क्रमांक पैसे काढण्यासाठी तुमच्या असणे गरजेचे असेल. कारण त्यावर ओटीपी येईल आणि तोच ओटीपी टाकून तुम्ही पैसे काढू शकाल.

बँकेतून पैसे काढण्याचे नवीन नियम

SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला OTP टाकावा लागेल.

हा ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल.

ग्राहकाला एकाच व्यवहारासाठी चार अंकी क्रमांकासह ओटीपी मिळेल.

रोख काढण्यासाठी या स्क्रीनमध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करावा लागेल.


Rainfall in Maharashtra: राज्याच्या ‘या’ भागांत पुढील 4 ते 5 दिवसात पावसाचा अंदाज

First Published on: May 19, 2022 10:43 AM
Exit mobile version