‘आता बूस्टर डोसची वेळ आली…’; कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात अदर पूनावालांचे महत्वाचे वक्तव्य

‘आता बूस्टर डोसची वेळ आली…’; कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात अदर पूनावालांचे महत्वाचे वक्तव्य

मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महाराष्ट्राला कोरोना निर्बंधमुक्त केलं आहे. मात्र भारतात कोरोनाची स्थिती सुधारली असली तरी, परदेशात अद्याप कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला नाही. अशातच कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र, या कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेसंदर्भात पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “देशात कोरोनाची चौथी लाट जेव्हा केव्हा येईल तेव्हा ती सौम्य स्वरुपाची असेल. या संदर्भात मला कोणतेही भाकित करायचे नसून कोरोनाच्या नव्या म्यूटंट्सना आपल्या देशाने दिलेला प्रतिसाद पाहिल्यास देशातील लस इतर देशांमधील लशींच्या तुलनेत कितीतरी पटीने चांगली आहे”, असं पूनावाला यांनी म्हटलं.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी पुण्यात अल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्हला उपस्थित दर्शवली होती. यावेळी अदर पूनावाला यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ‘बूस्टर डोसबद्दल आम्ही काही महिन्यांपासून सरकारला आवाहन केले आहे. याचे कारण प्रवास करणार्‍या प्रत्येकाला बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे. सरकारअंतर्गत देखील या संदर्भात चर्चा होत आहे. सरकार लवकरच बूस्टर धोरणाची घोषणा येत्या काही दिवसांत करेल असं वाटतं’, असे अदर पूनावाला यांनी यावेळी म्हटलं.


हेही वाचा – Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागलं; वाढत्या इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

First Published on: April 5, 2022 8:45 AM
Exit mobile version