‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरने हिंदू मंदिरात जाऊन केलं गरजूंना अन्नदान!

‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरने हिंदू मंदिरात जाऊन केलं गरजूंना अन्नदान!

'या' पाकिस्तानी क्रिकेटरने हिदू मंदिरात जाऊन केलं गरजूंना अन्नदान!

संपुर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना या कोरोनाने अनेकांचा बळी देखील घेतला आहे. भारतासह पाकिस्तानही या कोरोना व्हायरसशी सामना करताना दिसतोय. सध्या संपुर्ण देशात कोरोनादरम्यान संकटात सापडलेल्या लोकांना सर्वच स्तरातून मदतीचा हात दिला जात आहे. या खडतर काळात अनेक मंडळी गरजूंना अन्नदान करत आहेत. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीनेही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून पाकिस्तानातील गरिब व गरजू जनतेला अन्नदान करण्याची जबाबदारी स्विकारली आहे.

शाहिद आफ्रिदीने कोरोनाविरोधातील लढाईत आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पाकिस्तानातील लोकांना मदत केली आहे. संकटकाळात माणुसकी हाच एक धर्म असतो हे आफ्रिदीने सिद्ध केले असून पाकिस्तानातील श्री लक्ष्मी नारायण मंदीरात जाऊन आफ्रिदीने गरजू व गरिब व्यक्तींना अन्नदान केलं आहे. त्याच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक केले जात आहे. दरम्यान केलेल्या या मदत कार्याचे फोटो त्याने ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

तसेच, आफ्रिदीने कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आफ्रिदीने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो असे सांगताना दिसतोय की, आपल्या देशाला या जीवघेण्या आपत्तीपासून वाचवण्यासाठी सर्व ब्रँडसाठी तो विनामूल्य काम करण्यास तयार असेल. त्या जाहिरातीमधून जे काही पैसे येतील ते तो गोरगरीब लोकांना आर्थिक मदत म्हणून देईल.


ज्या मुलावर ३ वर्षापुर्वी केले अंत्यसंस्कार, लॉकडाऊनमध्ये आला अचानक घरी! आणि…
First Published on: May 13, 2020 7:23 PM
Exit mobile version