शेअर बाजारात तेजी; अमेरिकेतील महागाईत झालेल्या घटीचा परिणाम

शेअर बाजारात तेजी; अमेरिकेतील महागाईत झालेल्या घटीचा परिणाम

गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार वधारला त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झालेला दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक सेन्सेक्सने 1024 अंकांची उसळी मारत 61,414 अंकांवर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजारात 244 अंकांची वाढ होऊन 18,272 अंकांवर पोहोचला. तर सेन्सेक्सने पुन्हा 61 हजार अंकांची पल्ला पार केला. तर निफ्टी 287ने वधारला आहे

शेअर बाजारात सध्या जोरदार तेजी आल्याने बँक निफ्टीने पहिल्यांदाच 42,000 चा टप्पा गाठला. बाजारातील आजच्या तेजीमध्ये सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. प्रामुख्याने आयटी, एफएमसीजी, एनर्जी, ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठया प्रमाणात तेजी आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सही तेजीत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी फक्त एक शेअर लाल चिन्हात तर 49 शेअर्स हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. त्याचबरोबर सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 29 समभाग वाढीसह व्यवहार करत असून एक समभाग घसरत आहे.

गुरुवारी अमेरिकेतील चलनवाढीची आकडेवारी काही प्रमाणात धीम्या गतीने होत आल्याने डाऊ जोन्स, नॅस्डॅकसह जवळपास सर्वच निर्देशांकांमध्ये जोरदार उसळी मारलेली पाहायला मिळाली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 1201 अंकांच्या किंवा 3.70 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय, S&P 500 ने 5.54% ची उसळी घेतली आणि 207 अंकांनी वाढून 3956 च्या पातळीवर बंद झाला. तर, नॅसडॅक 7.35% ने 11114 वर बंद झाला.

हे शेअर्स वधारले
इन्फोसिस 4.05 टक्के, टेक महिंद्रा 3.86 टक्के, विप्रो 3.75 टक्के, एचसीएल टेक 3.59 टक्के, टीसीएस 3.52 टक्के टाटा स्टील 2.53 टक्क्यांनी वाढले आहेत.

शेअर बाजार तेजीत येण्याचे कारण
ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील महागाई दराच्या आकडेवारीत घट झाली होती. महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 8.2 टक्क्यांवरून 7.7 टक्के राहिला. तर चलनवाढीचा दर घसरल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठया प्रमाणात वाढ झाली. नॅसडॅक 7.35 टक्के म्हणजेच 760 अंकांनी वाढू 11,114 अंकांवर बंद झाला तर डाऊ जोन्स 1200 अंकांनी वधारला.


हे ही वाचा – ऑक्टोबरमध्ये जीएसटीपोटी जमा झाले 1.52 लाख कोटी, एप्रिलनंतरचे दुसरे सर्वोच्च संकलन

First Published on: November 11, 2022 11:09 AM
Exit mobile version