घरअर्थजगतऑक्टोबरमध्ये जीएसटीपोटी जमा झाले 1.52 लाख कोटी, एप्रिलनंतरचे दुसरे सर्वोच्च संकलन

ऑक्टोबरमध्ये जीएसटीपोटी जमा झाले 1.52 लाख कोटी, एप्रिलनंतरचे दुसरे सर्वोच्च संकलन

Subscribe

नवी दिल्ली : जीएसटी संकलनाचा आकडा दर महिन्याला वाढतच आहे. ऑक्टोबर 2022मध्ये एकत्रित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 16.6 टक्क्यांनी वाढून 1,51,718 कोटी रुपये इतके झाले आहे. जीएसटीने दुसर्‍यांदा मासिक 1.50 लाख कोटी संकलनाचा टप्पा पार केला आहे. एप्रिलमध्ये ते सुमारे 1.68 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या एकूण जीएसटी संकलामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 26,039 कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 33,396 कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 81,778 कोटी (माल आयातीवर संकलित केलेल्या 37,297 कोटींसह) आणि उपकर 10,505 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित केलेल्या 825 कोटींसह) यांचा समावेश आहे.

- Advertisement -

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला 37,626 कोटी रुपये (केंद्रीय) आणि एसजीएसटीला 32,883 कोटी रुपये चुकते केले आहेत. याव्यतिरिक्त, केंद्र आणि राज्यांमधे 50 : 50च्या प्रमाणात, त्या आधारावर 22,000 कोटी रुपये देखील चुकते केले आहेत. नियमित समझोत्यानंतर ऑक्‍टोबर 2022मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 74,665 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 77,279 कोटी रुपये आहे. हा नववा महिना असून सलग आठ महिने, मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. सप्टेंबर 2022मध्ये, 8.3 कोटी ई-वे बिले तयार झाली. ऑगस्ट 2022मध्ये तयार झालेल्या 7.7 कोटी ई-वे बिलांपेक्षा ती अधिक होती.

सप्टेंबरमध्ये 1,47,686 कोटींचे संकलन
सप्टेंबर 2022 महिन्यात, देशांत एकूण जीएसटी महसूल संकलन, 1,47,686 कोटी इतके झाले होते. त्यात सीजीएसटी (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर) संकलन 25,271 कोटी रुपये तर एसजीएसटी (राज्य वस्तू आणि सेवा कर) संकलन 31,813 कोटी रुपये इतके होता. तर आयजीएसटी 80,464 कोटी रुपये होता. यात 41,215 कोटी रुपये मालाच्या आयातीवरील शुल्काचाही समावेश) आणि उपकर म्हणजे सेस – 10,137 कोटी रुपये इतका होता.

- Advertisement -

सरकारने नियमित समझोत्याच्या आधारावर, आयजीएसटी मधून 31,880 कोटी, सीजीएसटी तर, 27,403 कोटी रुपये एसजीएसटी म्हणून धरले होते. या दोन्ही विभाजनानंतर, केंद्र आणि राज्य सरकारांचे सप्टेंबर महिन्यातील जीएसटी संकलन, 57,151(CGST) आणि 59,216 (SGST) इतके झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -