…तर केंद्रासह त्यांचे राज्यांतील हस्तक महाराष्ट्राचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; राऊत बरसले

…तर केंद्रासह त्यांचे राज्यांतील हस्तक महाराष्ट्राचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; राऊत बरसले

शिंदे- फडणवीस सरकार लवकरात लवकर घालवलं नाही तर केंद्र सरकार आणि आणि त्यांचे राज्या- राज्यातील हस्तक  महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत. अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमा प्रश्नावर शिंदे फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रात अत्यंत कमजोर, हतबल सरकार 

कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी बेळगावसह सीमाभाग राहिला बाजूला किंबहुना कोल्हापूरच्या पुढे जाऊन त्यांनी सांगलीतल्या गावांवर त्यांनी दावा केला आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद यामुळे निर्माण झाला आहे, कारण राज्यात अत्यंत कमजोर, हतबल असं सरकार आहे, या सरकारला महाराष्ट्र माहिती नाही, महाराष्ट्रा समजलेला नाही, असा आरोप राऊतांनी केला आहे.

कोणाला मुंबई तर कोणाला महाराष्ट्रातील गावं आणि जिल्हे तोडायचे

राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा वादावरील कोणत्या प्रश्नाला वाचा फोडली? ते या खात्याचे मंत्री होते. मुख्यमंत्री शिंदेंनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आणि पंतप्रधान मोदींशी चर्चा करु असे जाहीर केले, यानंतर लगेचच कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील आणखीन एका सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगितला, याचा अर्थ कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्रातही भाजपच्या नेतृत्त्वाखाली मिंधे सरकार आहे, कोणाला मुंबई तोडायची आहे, कोणाला महाराष्ट्रातील गावं आणि जिल्हे तोडायचे आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्र कुरतडण्याचे काम गेल्या साडे तीन महिन्यांपासून जोरात सुरु आहे, असा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे.

राजकीय दरोडेखोरांना वाटतंय आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो

राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. गुवाहाटीवरून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील आणखी एका तालुक्यावर दावा सांगितला नाही म्हणजे मिळवलं. असा टोलाही राऊतांनी शिंदे सरकारला लगावला आहे. ज्यापद्धतीचे सरकार महाराष्ट्रात आहे त्यावरून देशातील अनेक राजकीय दरोडेखोरांना वाटतंय आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो. राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत. त्यावर मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत, उपमुख्यमंत्री समर्थन करत आहेत, अशी टीकाही राऊतांनी केली.


भिवंडीत गोवर, रुबेलाचा कहर; 44 रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू

First Published on: November 23, 2022 11:07 AM
Exit mobile version