भिवंडीत गोवर, रुबेलाचा कहर; 44 रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू

measles disease rubella or govar outbreak in mumba 412 children infected 21 children on oxygen

राज्यभरात गोवर या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. लहान मुलांना मोठ्याप्रमाणात या आजाराची लागण होतेय. यात ठाण्यातील भिवंडीमध्ये गोवर, रुबेला आजाराने कहर केला आहे. भिवंडीमध्ये गोवर रुबेला आजाराचे संशयीत रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये 109 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊ तपासणीसाठी परेलमधील हाफकीन रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. यातील 44 रुग्ण हे गोवर रुबेलाबाधित असल्याचे रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. तर गोवर, रुबेलामुळे दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. साकिना ( 6 महिने) फतिमा ( 14 महिने) अशी मृत बालकांची नावं आहे.

आरोग्य कर्मचारी आता गोवर आणि रुबेलाचे रुग्ण आढळलेल्या बाधित क्षेत्रातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. यातील संशयित रुग्णांना व्हिटॅमिन एचा पहिला डोस आणि 24 तासांनी दुसरा डोस देण्यात आला, तसेच 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील ज्या लाभार्थ्यांनी गोवर, रुबेलाचा डोस घेतला नाही, अशा लाभार्थ्यांना गोवर, रुबेलाचा डोस दिला जात आहे.

गोवरबाधित रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांनी गोवर रुबेलाचा एकही डोस घेतलेला नाही. असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. सदर ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत विशेष गोवर रुबेला लसीकरण सत्र आयोजिक करण्यात येत आहे. गोवर रुबेला आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता आता आरोग्य विभागाकडून नियंत्रण, उपाययोजना आणि विचार विनिमय करण्यासाठी खाजगी बालरोग तज्ञ, सामाजिक संस्था, शिक्षण विभाग, अंगणवाडी पर्यवेक्षक, तसेच धर्मगुरु मौलाना यांची बैठक घेत आहे.

गोवरचा वाढता उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी ठिकठिकाणी लसीकरण मोहिम राबवत आहेत. यासाठी सामाजिक संस्था आणि नागरिकांना आवाहन केले जात आहे.


केंद्रात दर महिन्याला 16 लाख रोजगाराच्या संधी; रेल्वे मंत्र्यांचा दावा