‘शिवज्योती अर्पणम 2023’ उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात लावले जाणार 21 लाख दिवे

‘शिवज्योती अर्पणम 2023’ उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात लावले जाणार 21 लाख दिवे

दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात. यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करुन महादेवाचे मनोभावे स्मरण करतो. त्याच्यावर महादेव प्रसन्न होतात. यंदा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या मध्य प्रदेशातील उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री दिवाळीप्रमाणे उजळून निघणार आहे. उज्जैनचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पाहण्याचा मानस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा आहे. शिवाय याला ‘शिवज्योती अर्पणम 2023’ असे नाव देण्यात आले आहे.

सध्या उज्जैनमध्ये याची पूर्वतयारी सुरु झाली असून ‘शिवज्योती अर्पणम 2023’ या उपक्रमाअंतर्गत 18 फेब्रुवारीची महाशिवरात्र 21 लाख मातीच्या दिव्यांनी उजळून जाणार आहे. दरम्यान, मागील वर्षी महाशिवरात्रीला 11 लाख 71 हजार 78 मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. यावर्षी उज्जैनमध्ये 21 लाख दिवे लावले जातील. शिवज्योती अर्पणम 2023’ या उपक्रमाअंतर्गत उज्जैनमधील मंदिरे, व्यावसायिक ठिकाणे, घरे, क्षिप्रा नदीकाठ आणि शहरातील चौकांमध्ये अशा विविध ठिकाणी दिवे लावण्यात येतील.

तसेच या कार्यक्रमात 20 हजाराहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. यावेळेस उज्जैनच्या प्रमुख स्थळांवर रांगोळीही काढली जाईल आणि उज्जैन नगरी रांगोळ्या आणि दिव्यांच्या झगमगाटाने उठून दिसेल.

उज्जैनमध्ये महाशिवरात्रीपूर्वी साजरी केली जाते नवरात्र

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री आधी शिव नवरात्री महोत्सव साजरा केला जातो. या 9 दिवसांमध्ये महाकालचा 9 वेगवेगळ्या रुपांमध्ये श्रृंगार केला जातो. त्यामुळे महाकाल मंदिरातील पंडित आणि पुरोहित 1 महिनाआधी तयारी करण्यास सुरुवात करतात.


हेही वाचा :

महाशिवरात्रीला बनतोय दुर्लभ दुग्ध शर्करा योग; ‘या’ 3 राशींची होणार चांदी

First Published on: February 14, 2023 3:22 PM
Exit mobile version