खराब चप्पल दिली म्हणून दुकानदाराला खेचलं कोर्टात

खराब चप्पल दिली म्हणून दुकानदाराला खेचलं कोर्टात

आपण खरेदी करायला गेल्यावर दुकानातून एखादी वस्तू विकत घेतली, मात्र ती खराब निघाली तर आपण दुकानात जाऊन बदलून आणतो. मात्र, पाकिस्तानमधील कराची येथे अशी एक घटना घडली आहे, की तुम्हाला जागो ग्राहक जागोची आठवण येईल. कराची येथे पती आपल्या पत्नीसोबत चप्पल खरेदी साठी गेला. चप्पल घेऊन ते घरी आले. मात्र, काही दिवसांनी ती चप्पल तुटली. यामुळे चिडलेल्या पतीने दुकानदाराला न्यायालयात खेचले आहे.

महिलेने तारिक रोडवर असलेल्या दुकानातून १६०० रुपये देऊन चपलांचा जोड विकत घेतला. काही दिवसांनी त्या घातल्यानंतर चपलांचा जोड तुटला. याबाबत दुकानदाराशी चर्चा केली तेव्हा तो त्यातील एकही ऐकण्यास तयार नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने ग्राहक संरक्षण न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. पतीने ग्राहक संरक्षण न्यायालयात दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. चपला तुटल्या म्हणून पतीने दुकानदाराकडे तक्रार केली आणि त्याच्यासोबत चर्चा देखील करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकानदार कोणतीही गोष्ट ऐकून घेण्यासाठी तयार नव्हता. पतीने अखेर दुकानदाराविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. याचिका पाहिल्यानंतर न्यायालयाने सुनावणीसाठी हे प्रकरण मान्य केले आणि या प्रकरणातील साक्षीदारांना समन्स बजावले. न्यायालयाने दुकानदाराला दंड आकारला असून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

First Published on: December 20, 2020 6:01 PM
Exit mobile version