जम्मू-काश्मीरमध्ये चकमीत एक जावन शहिद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये चकमीत एक जावन शहिद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये चकमीत एक जावन शहिद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

आज सकाळपासून जम्मू-काश्मीरच्या कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमकी सुरु आहे. दरम्यान, कुलगाम येथील चकमकीत एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे.

हेही वाचा – जम्मू – काश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार

घरामध्ये दहशतवादी लपून बसले

रेडवानी गावातील एका घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्काराच्या जवानाला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी शोध मोहीम सुरु केली. या शोध मोहिमेत पोलीस, सीआरुपीएफ हे संयुक्तरित्या शोध मोहिम राबवत होते. आज सकाळपासून जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु होती. ही चकमक पाच तास चालली. पाच तासाच्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर एक जावान या चकमकीत शहीद झाला आहे.


हेही वाचा – पंजाबमध्ये ४ दहशतवादी घुसले; जम्मूपासून पंजाबपर्यंत हाय अलर्ट

First Published on: November 27, 2018 11:11 AM
Exit mobile version