घरदेश-विदेशजम्मू - काश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार

जम्मू – काश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार

Subscribe

शोपियनमध्ये ४ दहशतवाद्यांना ठार करण्यास लष्कराला यश आलवं आहे. तर यावेळी एक जवान शहीद झाला आहे.

जम्मू – काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात दहशतवादी आणि लष्करामध्ये झालेल्या चकमकीमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास लष्कराला यश आलं आहे. यामध्ये एक जवान देखील शहीद झाला आहे. मंगळवारी सकाळी दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक उडाली. त्यावेळी लष्करानं जशास तसे उत्तर दिलं. शोपियनमधील नदीमार्ग गावात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्करानं परिसरामध्ये शोध मोहिम हाती घेतली. यावेळी दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला. लष्करानं देखील दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले. ज्यामध्ये ४ दहशतवादी ठार झाले तर एक जवान शहीद झाला आहे. यावेळी दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अद्याप देखील चकमक सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली असून लष्करानं देखील दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -