घरदेश-विदेशपंजाबमध्ये ४ दहशतवादी घुसले; जम्मूपासून पंजाबपर्यंत हाय अलर्ट

पंजाबमध्ये ४ दहशतवादी घुसले; जम्मूपासून पंजाबपर्यंत हाय अलर्ट

Subscribe

२०१६ मध्ये पठाणकोट एयरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला लक्षात पंजाब पोलिसांनी भिती व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा देत सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

पंजाबमध्ये चार संशयित दहशतवादी घुसल्याची शक्यता आहे. त्यामुळे पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. एका कार चालकाला बंदूकीचा धाक दाखवून चार दहशतवाद्यांनी कारवर ताबा मिळवला असून ती कार घेऊन ते जम्मूवरुन पंजाबकडे येत आहेत. पंजाब पोलिसांना गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर पंजाब राज्यामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. या घटनेमुळे २०१६ मध्ये पठाणकोट एयरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला लक्षात पंजाब पोलिसांनी भिती व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा देत सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

- Advertisement -

एसयूव्ही कारमधून येत आहे दहशतवादी

एका एसयूव्ही कारमधून चार दहशतवाद्यांनी जम्मूकडून येत आहे. त्यांनी जम्मूच्या टॅक्सी स्टँडवरुन कारला बूक केले होते. हे सर्व दहशतवादी पंजबीमध्ये बोलत आहेत. मंगळवारी रात्री माधोपूरजवळ या दहशतवाद्यांनी कार चालकाला बंदूकीचा धाक दाखवून गाडीतून त्याला बाहेर फेकले आणि कार घेऊन फरार झाले. या घटनेनंतर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्याचसोबत सुरक्षा एजन्सीला हाय अलर्ट देण्यात आला आहे.

पोलिसांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरु

पंजाबचा पठाणकोट जिल्हा आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या परिसरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. पंजाब पोलिसांनी सांगितले की, एसयूव्ही गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलीस त्या घटनास्थळावर देखील गेले जिथे या दहशतवाद्यांनी जेवण केले होते. त्याठिकाणचे सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केले असून त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- Advertisement -

२०१६ पठाणकोट हल्ला

पंजाबच्या पठाणकोटमध्ये २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. पठाणकोटच्या एअरबेसवर हा हल्ला केला होता. त्यावेळी ही दहशतवाद्यांनी पंजाब पोलीस अधिकाऱ्याची कारवर ताबा मिळवून फरार झाले होते. पठाणकोटच्या या हल्ल्यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेलाच लक्षात घेता पंजाब पोलिसांनी राज्यामध्ये हाय अलर्ट दिला आहे. त्याचसोबत सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -