श्रीलंकेत राष्ट्रपतीभवन बनलं पिकनिक स्पॉट, आंदोलकांचा स्विमिंग पूलमध्ये धिंगाणा

श्रीलंकेत राष्ट्रपतीभवन बनलं पिकनिक स्पॉट, आंदोलकांचा स्विमिंग पूलमध्ये धिंगाणा

श्रीलंकेतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, काही देशांनी श्रीलंकेला मदत करण्याची आणि पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. परंतु श्रीलंकेत सुरू असलेल्या गदारोळात पंतप्रधानांच्या ‘टेम्पल ट्री’ या अधिकृत निवासस्थानातील काही दृश्यं समोर आली आहेत. काही फोटो हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

राष्ट्रपती भवनात काही आंदोलक हे जीम करताना दिसत आहेत. तर काही लोकं स्वीमिंग पूलमध्ये पोहत आहेत. काही लोकं निवासस्थानातील सोफ्यावर बसून आराम करत आहेत. काही लोकं अंगणात फिरताना दिसत आहेत. पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.

सध्या राष्ट्रपती भवनाच्या आत आंदोलकांची संख्या एवढी आहे की, पोलिसांना हवे असले तरी काहीही करता येत नाहीये. जोपर्यंत गोटाबाया राजपक्षे आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत कोणीही येथून जाणार नाही. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर संपूर्ण ताबा मिळवला आहे.

श्रीलंकेतील भीषण आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भारताने यावर्षी ३.८ अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक मदत दिली आहे. श्रीलंका आणि येथील लोकं ज्या अनेक आव्हानांना तोंड देत आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती आहे. आम्ही श्रीलंकेतील लोकांच्या पाठीशी उभे आहोत, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.


हेही वाचा : जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, कसा पाहता येणार निकाल?


 

First Published on: July 11, 2022 10:01 AM
Exit mobile version