पतीला मुंबईकडे जाण्यापासून रोखण्याकरता पत्नी आली बस समोर आणि…

पतीला मुंबईकडे जाण्यापासून रोखण्याकरता पत्नी आली बस समोर आणि…

पतीला मुंबईकडे जाण्यापासून रोखण्याकरता पत्नी बस समोर आली आणि तिथेच मरण पावली.

देशात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर सर्वात जास्त फटका हा महाराष्ट्र राज्याला बसला असून मुंबईत सर्वात अधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे मुंबईत जाऊ नका, अशी विनंती करणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

झारखंड येथे हजारीबाग मधील विष्णुगढ मधील सारुकुदर गावात एक हृदयदाहक घटना घडली आहे. मुंबईला जाण्यापासून पतीला रोखण्यासाठी धावून येणारी पत्नी पतीकडूनच मरण पावली आहे. वासुदेव महतो असे या पतीचे नाव आहे. तर पत्नीचे नाव कुंती देवी (३०) आहे. वासुदेव हा मुंबई ते विष्णुगढ असा बसने मजुरांना घेऊन यायचा. दरम्यान, वासुदेव मुंबईतून मजुरांना घेऊन विष्णुगढ येते दाखल झाला. त्यानंतर तो आपल्या कुटुंबियांना भेटला आणि पुन्हा मजुरांना आणण्यासाठी मुंबईला निघाला होता. त्या दरम्यान, मुंबईत वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहून घाबरलेल्या पत्नीनेने पतीला जाण्यास नकार दिला. मात्र, आपले कर्तव्य बजावणारा पती बसमध्ये बसला आणि निघाला. तेवढ्यातच पत्नी बसच्या समोर आली आणि त्याचवेळी बस सुरु केली गेली. त्यामध्ये कुंती हिचा पतीकडूनच दुर्दैवी अंत झाला आहे.

घाबरवायला गेलो आणि

मिळालेल्या माहितीनुसार; वासुदेव महतो याला मुंबईला जाऊ नको अशी पत्नीने पतीकडे खूपदा विनवणी केली. मात्र, तो ऐकला नाही. त्यामुळे पत्नी त्याच्या बसच्या समोर येऊन उभी राहिली. दरम्यान, पत्नीला घाबरवण्यासाठी पतीने गाडी सुरु केली. मात्र, पत्नी तिथून हली नाही आणि चाकाखाली येऊन जागीच ठार झाली. त्यानंतर ते दृश्य पाहून घाबरलेल्या वासुदेवने पळ काढत दुसऱ्या चालकाच्या हातात बस दिली आणि घटनास्थळावरुन पळाला. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.


हेही वाचा- मजूर, शेतकर्‍यांना मदत केली नाही तर आर्थिक आपत्ती येईल – राहुल गांधी


 

First Published on: May 22, 2020 8:19 PM
Exit mobile version