Last Supermoon Of The Year 2021: आज दिसणार स्ट्रॉबेरी मून; जाणून घ्या या खास दिवसाबद्दल

Last Supermoon Of The Year 2021: आज दिसणार स्ट्रॉबेरी मून; जाणून घ्या या खास दिवसाबद्दल

Last Supermoon Of The Year 2021

आकाशप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे २०२१ वर्षाचा शेवटचा सुपरमून या आठवड्यात आकाशात दिसणार आहे. अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी सुपरमून त्याच्या जास्तीत जास्त उंचीवर असणार आहे. भारतात स्ट्रॉबेरी मून पहाटे १२.१० च्या सुमारास दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

यंदा सुपरमूनला स्ट्रॉबेरी मून असे नाव का?

उत्तर अमेरिकेत सध्या स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू आहे, म्हणून या वेळी सुपरमूनचे नाव स्ट्रॉबेरी मून असे ठेवण्यात आले आहे. विवाहसोहळ्यासाठी अधिक शुभ मुहूर्त असल्याने जून महिन्यात या सूपरमूनला ‘हनी-मून’ म्हणूनही ओळखले जाते. या व्यतिरिक्त त्याला ब्लूमिंग मून, ग्रीन कॉर्न मून, एग लेयिंग मून, हॅचिंग मून, होअर मून, बर्थ मून आणि मीड मून अशी नावेही देण्यात आली आहे, अशी माहिती फार्मर्स अलमॅनेक (Farmer’s Almanac) यांनी दिली आहे.

पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार चंद्र

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्याने ज्यामुळे त्याचा आकार सामान्यतः दिसणार्‍या चंद्रापेक्षा खूपच मोठा दिसणार आहे. यासह, त्याचा प्रकाश देखील अधिक असेल. गुरुवारी सुपरमून गुलाबीऐवजी सोनेरी दिसणार आहे. या दरम्यान, आकाशातील चंद्रासह शुक्र व मंगळदेखील आकाशात दिसतील.

१९३० पासून सूपरमूनची नावे निश्चित

१९३० मध्ये प्रथमच सुपरमूनची नावे फार्मर अलमॅनेक यांनी निश्चित केली होती. त्यानुसार एप्रिलमध्ये दिसलेल्या सुपरमूनला ‘पिंक मून’ असे नाव देण्यात आले. दरम्यान, या काळात अमेरिकेत एक वनस्पती आढळते. त्यानंतर सुपरमूनला असे नाव देण्यात आले होते.


First Published on: June 24, 2021 5:35 PM
Exit mobile version