राज्यातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेले सुबोध जयस्वाल नवे सीबीआय प्रमुख

राज्यातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेले सुबोध जयस्वाल नवे सीबीआय प्रमुख

Phone tapping case : CBI प्रमुख सुबोध जैस्वाल यांचा सायबर गुन्हे शाखेच्या प्रश्नावलीला प्रतिसाद

सीआयएसएफचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (CBI) प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. जयस्वाल हे १९८५ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी ही नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेट कमिटीच्या मंजुरीनंतर ही नेमणुकीची ऑर्डर देण्यात आली. सीबीआयच्या प्रमुखपदी अधिकारी नेमणुकीसाठी समितीची नेमणूक करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समितीच्या अध्यक्षपदी होते. समितीच्या शिफारशीनुसार, सीबीआयचे नवे प्रमुख म्हणून सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दोन वर्षानंतर होणार सेवानिवृत्त

मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सुबोध जयस्वाल यांनी याआधी जबाबदारी पार पाडली आहे. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, तेलगी स्टॅम्प घोटाळा अशा अनेक महत्वाच्या घटनांचा तपास जयस्वाल यांनी केला आहे. त्यांनी ९ वर्षे देशाच्या गुप्तचर विभागाचे काम बघितले होते. परंतु, त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्ती मागून घेतली होती. सध्या जयस्वाल हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) महासंचालक म्हणून काम करत होते. जयस्वाल यांची आता सीबीआयचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली असून दोन वर्षानंतर ते सेवानिवृत्त होत आहेत.

First Published on: May 25, 2021 11:24 PM
Exit mobile version