बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यांवर आत्मघाती हल्ला; ९ ठार

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यांवर आत्मघाती हल्ला; ९ ठार

पाकिस्तानी सैन्यांवर आत्मघाती हल्ला

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तीन दिवसानंतर बलूचिस्तानजवळ पाकिस्तानच्या सैन्यांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याच ९ पाकिस्तानी सैन्य ठार झाले तर ११ सैन्य जखमी झाले. बलूच राजी अजोई संगर संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. बलूच राजी अजोई संगर या संघटनेमध्ये बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट, बलूच लिबरेशन आर्मी आणि बलूच रिपब्लिकन गार्डस या तीन संघटनांचा समावेश आहे.

मोहम्मद बिन सलमान पाकिस्तान दौऱ्यावर

द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, बलुचिस्तानच्या तुरबत आणि पंजगुर दरम्यान पाकिस्तानी सैन्यांवर आत्मघाती हल्ला करण्यात आला. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असलेल्या भागात हा हल्ला झाला. या आत्मघाती हल्ल्यात ९ जण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान पाकिस्तानात पोहोचण्याच्या काही तास आधी हा हल्ला झाला. मोहम्मद बन सलमान पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पाकिस्ताने पंतप्रधान इमरान खान आणि पाकिस्तानी आर्मी चीफ जनरल कमर बाजवा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक व्यापारी करार झाले.

हल्ल्याची जबाबदारी स्विकारली

दरम्यान, या हल्ल्याच्या काही वेळातच या हल्ल्याची जबाबदारी बलुच राजी अजोई संगर या दहशतवादी संघटनेने स्विकारली. आमच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या गस्ती पथकावर आणि त्यांच्या तळावर एकाच वेळी हल्ला केला, अशी माहिती बलुच राजी अजोई संगरचे प्रवक्ते बलोच खान यांनी दिली.

First Published on: February 18, 2019 9:48 AM
Exit mobile version