सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी ९ ऑक्टोबरपासून अंतिम सुनावणी

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी ९ ऑक्टोबरपासून अंतिम सुनावणी

सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्ली हाय कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अखेर ९ ऑक्टोबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. दिल्ली पोलीसांनी आज हायकोर्टात या प्रकरणी त्यांचा अहवाल सादर केला. त्यानंतर कोर्टाने पुढील महिन्यात खटल्याच्या अंतिम सुनावणीला सुरूवात होईल, असे स्पष्ट केले. या प्रकरणी सुनंद पुष्कर यांचे पती आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्यावर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली.

शशी थरूरवर आरोपपत्र दाखल

यापूर्वी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात झालेल्या सुनावणीत काँग्रेस नेता आणि याप्रकरणातील संशयीत आरोपी शशी थरूर यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र, थरूर यांना एक लाख रूपयांचा जामीनपत्र भरावा लागला होता. थिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी देताना हा निर्णय देण्यात आला होता. शशी थरूर यांना सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी यापूर्वीच आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आला आहे.

काय आहे नेमक प्रकरण

सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील लीला हॉटेलच्या बाथरूममध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्रिवेदम ते दिल्ली विमान प्रवासात सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांच्यात भांडण झाले होते. तसेच दिल्ली विमानतळावर देखील दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणानंतर सुनंदा पुष्कर यांनी स्व:ताला हॉटेलच्या बाथरूममध्ये ४५ मिनिटे कोंडून घेतले होते. विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी शशी थरूर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

First Published on: September 25, 2018 3:26 PM
Exit mobile version