ट्रम्प यांच्या एच १-बी व्हिसा निर्णयावर सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली नाराजी

ट्रम्प यांच्या एच १-बी व्हिसा निर्णयावर सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली नाराजी

ट्रम्प यांच्या एच १-बी व्हिसा निर्णयावर सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली नाराजी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एच १-बी व्हिसा निलंबित करण्याची घोषणा केली. यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या हजारो लोकांना झटका लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत स्थित असलेल्या गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी ट्रम्प यांच्या निर्णयामुळे निराश आहे आणि मी स्थलांतरितांच्या पाठीशी उभा राहणार आहे’, असे सुंदर पिचाई म्हणाले.

सुंदर पिचाई यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘अमेरिकेच्या आर्थिक यशात या स्थलांतरितांनी मोठे योगदान दिले आहे. यामुळे अमेरिकेने तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक आघाडी घेतली आहे. सरकारने आज केलेल्या घोषणेमुळे मी निराश आहे. आम्ही स्थलांतरितांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना संधी निर्माण करू.’ ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘हा निर्णय अमेरिकन कामगारांच्या हितासाठी घेण्यात आला आहे.’

एच १-बी व्हिसा म्हणजे काय?

एच १-बी व्हिसा हा प्रवासी नसलेला व्हिसा आहे. अमेरिकेत काम करणार्‍या कंपन्यांना हा व्हिसा अमेरिकेत कमतरता असलेल्या कुशल कर्मचार्‍यांना ठेवण्यासाठी दिला जातो. या व्हिसाची वैधता सहा वर्षांची आहे. अमेरिकन कंपन्यांच्या मागणीमुळे भारतीय आयटी व्यावसायिकांना हा व्हिसा सर्वाधिक मिळतो.


हेही वाचा – भारताला मोठे यश; पूर्ण लडाखमधून सैन्य माघार घेण्यास चीनची सहमती


 

First Published on: June 23, 2020 4:57 PM
Exit mobile version