घरताज्या घडामोडीभारताला मोठे यश; पूर्ण लडाखमधून सैन्य माघार घेण्यास चीनची सहमती

भारताला मोठे यश; पूर्ण लडाखमधून सैन्य माघार घेण्यास चीनची सहमती

Subscribe

लडाख मधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. या हिंसक चकमकीत भारताने २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत-चीन या दोन देशांमध्ये तणाव वाढला. पण सोमवारी हा तणाव कमी झाल्याचे दिसून आले. सोमवारी दोन्ही देशांमध्ये कमांडर-स्तरीय बैठक झाली. या झालेल्या बैठकीदरम्यान ड्रॅगनने पूर्व लडाखमधील वादग्रस्त भागातून आपले सैनिक हटवण्यासाठी सहमत झाले. या बैठकीमुळे भारताला मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.

सुत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखमधून सैनिकांना हटवण्यासाठीच्या कार्यवाहिला लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या चर्चेदरम्यान भारताने स्पष्ट केले की, ‘५ मेपूर्वी जशी एलएसीवर स्थिती होती तशीच स्थिती आताही व्हायला हवी.’ म्हणजे भारताने स्पष्टपणे चीनला आपल्या सीमेवर माघारी जायला सांगितले. ६ जूनला दोन्ही देशांदरम्यान कमांडर-स्तरीय पहिली बैठक पार पडली होती. त्यावेळेस यादरम्यान दोन्ही देशांमधील समस्या दूर करण्यासाठी एक करार झाला होता. १५ जून रोजी झालेल्या हिंसक चकमकी नंतर सीमेवरील स्थिती बिघडली होती. परंतु दोन्ही बाजूंना ३५०० किलोमीटर सीमेजवळ आपले सैन्य तैनात केले होते. तसेच चीनच्या कोणत्याही दुष्कृत्याला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश सैन्याला देण्यात आले होते. पण आता भारत-चीनमधील तणाव कमी होताना दिसत आहे.

- Advertisement -

यापूर्वी भारताच्या वतीने १४ कोर कमांडर लेफ्टिनेंट जनरल हरिंदर सिंग आणि दक्षिण झिनजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्ट चीफ मेजर जनरल लियू लिन यांच्यात बैठक पार पडली होती.


हेही वाचा – भारत – चीनी सैनिकांमधील संघर्षाचा ‘तो’ व्हिडीओ आला समोर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -