महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनवणी आज संपली. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तीन दिवस झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करत अनेक कायदेशीर मुद्दे कोर्टात मांडण्यात आले. (supreme court hearing on maharashtra political crisis will be held on 28 february 2023)

राज्याच्या सत्तासंघर्षात सलग तीन दिवस युक्तिवाद झाला. मात्र, अद्यापही फक्त ठाकरे गटाचाच युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे उर्वरित सुनावणी ही 28 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. यावेळी ठाकरे गट आपला युक्तिवाद पूर्ण करेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची बाजू मांडण्यात येईल. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणी काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर 21 फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू असलेली सुनावणी आज संपली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तिनही दिवस ठाकरे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करण्यासाठी वेळ दिला होता. विशेष म्हणजे याच आठवड्यात सुनावणी जारी राहील असे सर्वांना वाटत होते. परंतु, सरन्यायाधीशांनी अचानक सुनावणी पाच दिवस पुढे ढकलून 28 फेब्रुवारीला घेण्याचे निश्चित केले आहे.

सलग तीन दिवस सुनावणी

28 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सुनावणीवेळी शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवादासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात येणार असल्याचे समजते. याशिवाय महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वकिलांनाही युक्तिवाद करायचा असल्यामुळं सुनावणीची वेळ आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – ठाकरेंच्या अडचणी आणखी वाढणार, मशाल चिन्हावरून समता पक्षाची SC मध्ये धाव

First Published on: February 23, 2023 5:23 PM
Exit mobile version